आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समृद्धी’ दरपत्रकाला विरोध; आत्मदहन करण्याचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
वैजापूर  - राज्य सरकारने नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनासाठी विभागवार शेतजमिनींसाठी जाहीर केलेल्या दरपत्रकाला जांबरगाव, आगरसायगाव, कनकसागज येथील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.   जमीन संपादनासाठी सुरुवातीपासून मोजणी, संपादनासाठी नोटिसा या प्रक्रिया कायदेशीर निकषात झाल्या नसल्याने प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्यांवर  पोलिस बळाचा वापर करून जमिनी ताब्यात घेण्याची दांडगाई केल्यास  तीन गावांतील शेतकऱ्यांनी  भूसंपादन अधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा  दिला. 
 
 खासगी वाटाघाटींतून २८ ते ३५ लाख रुपये एकरी भाव देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना  दिले होते. मात्र  जाहीर केलेल्या दरपत्रकात तीन गावांतील जमीन संपादनासाठी दिलेला अत्यल्प दर आम्हाला मान्य नसल्याचे शेतकऱ्यांनी ठणकावून सांगत, ४० लाख रुपये प्रतिएकर दराचा मोबदला दिल्यास भूसंपादनासाठी जमीन देण्याचा विचार करू, असे सांगितले. विभागवार भूसंपादनासाठी जाहीर केलेल्या दरपत्रकात मोठी तफावत आहे. रस्त्यासाठी आमच्या जमिनीवर डोळा ठेवून असलेल्या प्रशासनाकडून शेतातील विहीर, पाइपलाइन आदी सिंचनाच्या निर्माण केलेल्या सुविधांचा कुठे विचार न करता आमच्या जमिनी कोरडवाहू दराने खरेदी करण्याचा घाट घातला जात आहे. सक्तीने भूसंपादन केल्यास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा समृद्धी महामार्गविरोधी  कृती समितीचे पदाधिकारी भगतसिंह राजपूत, रमेश बेडवाल, उत्तम साठे, भगवान साठे, महेश राजपूत, गणेश गवळी आदींसह शंभर शेतकऱ्यांनी  दिला आहे. 
बातम्या आणखी आहेत...