आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेथरार: 'नागरिक'मध्ये सत्ता अन् पत्रकारितेतील संघर्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्यावर सडेतोडपणे टीका करणारे पत्रकारितेचे क्षेत्र या दोन्हीभोवतीच ‘नागरिक’ हा चित्रपट फिरतो. यात ईर्षा, संस्कारमय विचार यांच्यातील संघर्ष तसेच सत्तेचे स्वप्न सर्वसामान्यांचे स्वप्न यातील तफावत मांडण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास अभिनेते सचिन खेडेकर यांनी व्यक्त केला.
"नागरिक'च्या प्रमोशनसाठी खेडेकर शहरात आले होते. पत्रकार परिषदेत त्यांनी चित्रपटासह विविध विषयांवर मत व्यक्त केले. चित्रपटात त्यांनी पत्रकाराची भूमिका साकारली आहे. ते म्हणाले, आज टीव्हीवर चित्रपट पाहण्याची सवय असली तरी प्रत्यक्षात चित्रपटातील थरार अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाणे गरजेचे आहे. या चित्रपटात पत्रकार आणि राजकीय संघर्ष मांडण्यात आला आहे. राजकारणी विकास पाटील अर्थात मिलिंद सोमण आणि पत्रकार म्हणून श्याम जगदाळे म्हणजेच सचिन खेडेकर या दोघांमधील अभिनयाची जुगलबंदी दाखवण्यात आली आहे. श्रीराम लागू हे नाना चिटणीस नावाच्या जुन्या राजकारणी व्यक्तीची भूमिका रंगवत आहेत.
केंद्रीय मंत्री माणिकराव भोसलेंच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर आहेत. देविका दफ्तरदार विशेष भूमिकेत आहे. इतर कलाकारांनीही भूमिका साकारली आहे. या वेळी बोलताना संगीत दिग्दर्शक संभाजी भगत म्हणाले, पारंपरिक तांड्या-वस्तीवरील गाणी नवीन गाणी यांची सरमिसळ घातली आहे. कथानकाला पुढे नेण्याचे काम याद्वारे होते. सुखविंदरसिंग, शंकर महादेवन, शाहीर संभाजी भगत यांनीसुद्धा गाणी गायली असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या १२ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याचेही अभिनेते खेडेकर यांनी सांगितले. या चित्रपटात सुलभा देशपांडे, माधव अभ्यंकर, राजेश शर्मा, राजकुमार तांगडे, नितीन भजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत निर्माते सचिन चव्हाण, संभाजी भगत, देविका दफ्तरदार, दिग्दर्शक जयप्रद देसाई यांची उपस्थिती होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा...सामाजिक जाणीव निर्माण करणारा चित्रपट
बातम्या आणखी आहेत...