Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» News About Nathshashthi Yatra Paithan

पैठण: समाधानकारक पावसाने धरणही भरले अन् षष्ठीची नाथनगरीही बहरली

रमेश शेळके | Mar 20, 2017, 08:44 AM IST

  • पैठण: समाधानकारक पावसाने धरणही भरले अन् षष्ठीची नाथनगरीही बहरली
पैठण-महाराष्ट्रात पंढरपूरनंतर सर्वात मोठा नाथषष्ठीचा सोहळा समजला जातो. परंतु सतत तीन वर्षे दुष्काळ, स्वाइन फ्लू अन् अवकाळी पावसामुळे यात्रा सुरळीत पार पडली नव्हती. २०१४ मध्ये स्वाइन फ्लूने तर यात्रेवर परिणाम झाला होता. २०१५ मध्ये अवकाळीमुळे तीन दिवसांची नाथषष्ठी एक दिवसापुरतीच भरली होती. २०१६ मध्ये दुष्काळाच्या सावटाखाली षष्ठीत भाविकांची संख्या कमालीची रोडावल्याने यात्रेवर याचा परिणाम झाला होता. परंतु यंदा राज्यात समाधानकारक पाऊस झाल्याने असून गत तीन वर्षांच्या तुलनेत यंदा यात्रेत वारकऱ्यांची संख्या वाढली आहे.
स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा कचरा निर्मूलनाचा गंभीर प्रश्न यंदा प्रशासनाने व्यवस्थितरीत्या हाताळल्याने यात्रेत स्वच्छता उत्साहासह वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे.

गतवर्षी जायकवाडीची पातळी खोलवर गेल्याने येथे टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. पाण्यासाठी वारकऱ्यांची मोठी भटकंती झाली होती. परंतु यंदा धरणाची पातळी पावसाळ्यानंतर ८० टक्क्यांवर होती. ती आजदेखील ५० टक्क्यांपर्यंत असल्याने वारकरी-भाविकांच्या सोयीसाठी येथे पाणी सोडण्यात येते. फडाफडात पाण्याची सोय केल्याने यंदा वारकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. तीन वर्षे सतत दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या यात्रेत यंदा चांगल्या पाऊसमानामुळे उत्साह आहे.
वारीत आम्ही अनेक वर्षांपासून येतो आहोत. मागील चार वर्षे विविध नैसर्गिक संकटांचा सामना करीत असतानाच प्रशासनाच्या काहीशा उदासीन भावनेचा वारकऱ्यांना फटका बसत होता. यंदा प्रशासनाच्या उत्तम तयारीने त्रास झाला नाही.
- ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, विश्वस्त
षष्ठीत राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी तीन दिवस येतात. तीन वर्षे नैसर्गिक संकटात यात्रा गेली. याचा फटका व्यापाऱ्यांना बसला.आता मात्र प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने आरोग्य, धूळमुक्त शहर झाल्याचे दिसते.
- संतोष गव्हाणे, नागरिक, पैठण
धूळमुक्तीसाठी पालिकेची यंत्रणा आली कामी
नगराध्यक्षसूरज लोळगे यांच्या पुढाकाराने यंदा शहरात औरंगाबाद महानगर पालिकेची धूळमुक्तीसाठी यंत्रणा आणण्यात आली. रोज यात्रेच्या काळात ती रात्री शहरातील धूळ साफ करते, शिवाय प्रत्येक फडाला एक नळ अशी व्यवस्था करण्यात आल्याने वारकरी सुखावल्याचे दिसले.

सलग चार वर्ष षष्ठीवर सावट...
२०१३-१४मध्ये स्वाइनफ्लूसारख्या महामारीचे महाराष्ट्रावर संकट होते. त्यातच पैठणची राज्यातील दोन नंबरची यात्रा आली. या स्वाइन फ्लूमुळे वारकरी, भाविकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. यात प्रशासनाने काही तात्पुरत्या उपाययोजना केल्या. यात मास्क, औषधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तेव्हा मोठ्या प्रमाणावर षष्ठीत वारकऱ्यांची संख्या घटली होती.

२०१५मध्ये महाराष्ट्रातदुष्काळ पडल्याने यात्रा ही फक्त दर्शनीय एक दिवसाचीच भरली होती. यात्रेमध्ये पिण्याचे पाणी टँकरने आणावे लागले होते.भाविकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली होती. शहरातील धुळीचे प्रमाण प्रचंड असल्याची बाब समोर आली होती. शिवाय आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. डॉक्टरांच्या पथकाने स्वाइन फ्लूसारख्या गंभीर रोगाची साथ राज्यात सुरू असताना पैठणची यात्रा पार पडली.

२०१६मध्ये दुष्काळाचाफटका वारकऱ्यांना बसला होता. त्यात प्रशासनाचा काहीसा नियोजनाचा अभाव राहिल्याचे दिसले. यंदा मात्र निसर्गाने साथ दिल्याने वारकऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांनी दिली.

४०० मोबाइल शौचालये
- नाथयात्रेमध्येचारशे मोबाइल शौचालये उभारण्यात आली आहेत. ही शौचालये पहिल्यांदाच आणल्याने शहरातील दुर्गंधी कमी होणार आहे. यापुर्वी आभाव होता.
- महाराष्ट्रावर सलगतीन वर्षे दुष्काळासह स्वाइन फ्लू,अवकाळीचा मारा षष्ठीदरम्यान राहिल्याने या नैसर्गिक आपत्तीचा फटका भाविक वारकऱ्यांना बसला होता. त्यात एकदा तर शुद्ध पिण्याचे पाणी, कचरा निर्मूलनाची सोय स्वच्छतेअभावी प्रत्येक वेळी सतत तीन वर्षे ही नाथषष्ठी गाजत आहे. मात्र यंदा पहिल्यांदाच नाथषष्ठीत शुद्ध पाणी,आरोग्य, धूळमुक्त यात्रा, प्रशासनाच्या नियोजनाचा बोलबाला आहे.
- पैठणच्या नाथयात्रेमध्ये लाखो वारकरी हे गोदावरीच्या वाळवंटासह शहरातील विविध ठिकाणी फड टाकून मुक्कामी असतात. मात्र तीन वर्षांपूर्वी नाथषष्ठीच्या पहिल्याच दिवशी अवकाळी पावसाने कहर केल्याने यात्रेमधील व्यापाऱ्यांचे हाल झालेच, शिवाय वारकरी भाविकांच्या राहण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. तत्कालीन तहसीलदार संजय पवार यांनी वारकऱ्यांना विविध मठांत, मंदिरात सोय उपलब्ध करून दिली होती.

यंदा निसर्गाने साथ दिल्याने वारकरी मोठ्या संख्येने आले आहेत. या वारकऱ्यांना नगर परिषदेने सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. धूळ, स्वच्छता, आरोग्य याकडेही विशेष लक्ष देण्यात आले आहे. पैठणच्या यात्रेमध्ये राज्यातील वारकरी येतो.
- सूरज लोळगे, नगराध्यक्ष

Next Article

Recommended