आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय विज्ञान लघुपट महोत्सवात औरंगाबादची फिल्म, महाराष्ट्रातील 5 जणांची निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सामान खरेदी केल्यावर वापरलेली पॉलिथीनची कॅरीबॅग नंतर फेकली जाते. मात्र, पॉलिथीन बॅगला नाही म्हटले तर यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान टाळता येऊ शकते. हाच संदेश देणाऱ्या औरंगाबादच्या ऋषिकेश दौड या विद्यार्थ्याच्या शॉर्ट फिल्मची राष्ट्रीय विज्ञान लघुपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. 

केंद्र शासनाच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या वतीने कोलकात्यात आयोजित महाेत्सवात राज्यातून केवळ फिल्मची निवड झाली असून मराठीतील एकमेव फिल्म औरंगाबादची आहे. “दिव्य मराठी’च्या लघुचित्रपट महोत्सवातही या फिल्मला पुरस्कार मिळाला होता. 

जगभरात पॉलिथीन बॅगमुळे दरवर्षी १० दशलक्ष प्राणी मृत्युमुखी पडतात. केवळ एक टक्का पॉलिथीन बॅगचे रिसायकालिंग होते. त्या कुजण्यासाठी एक हजार वर्षे लागतात. जमिनीत पुरलेली कॅरीबॅग मातीचे, जाळलेली कॅरीबॅग हवेचे तर पाण्यासोबत वाहून गेलेली कॅरीबॅग जलस्रोतांचे नुकसान करते. यामुळेच देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई मॅकेनिकलच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी ऋषिकेश दौड याने याविषयी जनजागृती करण्याच्या हेतूने “प्लास्टिकच्या पिशवीला नाही म्हणा’ ही शॉर्ट फिल्म तयार केली.
 
‘दिव्य मराठी’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित लघुपट महोत्सवात ऋषिकेशच्या या फिल्मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले होते. आता या फिल्मची १४ ते १७ फेब्रुवारीदरम्यान कोलकात्यातील बिर्ला इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल म्युझियममध्ये होणाऱ्या ७व्या राष्ट्रीय विज्ञान लघुपट महोत्सव आणि स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

मराठीतील एकमेव फिल्म : विज्ञानशॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये शासकीय स्वयंसेवी संस्था, खासगी प्रॉडक्शन हाऊस, महाविद्यालयीन आणि शालेय अशा चार गटांत चित्रपट फिल्म मागवण्यात आल्या होत्या. यात देशभरातून ५३ फिल्म्स आल्या आहेत. मुंबई आणि पुण्यातून प्रत्येकी इंग्रजीतील दोन फिल्म आहेत, तर मराठीतून ऋषिकेशची फिल्म आहे. यास इंग्रजीत सबटायटल्स देण्यात आले आहेत. एक शाळकरी मुलगा दुकानात सामान घेण्यासाठी जातो. दुकानदार त्यास पॉलिथीन बॅग देऊ करतो. पण तो मुलगा यास नकार देत जमेल तशा अवस्थेत सामान घरी आणतो. त्याच्या नकारामुळे पर्यावरणाचे नुकसान करण्यापासून एक पॉलिथीन बॅग वाचली. आपणही पॉलिबॅगला नाही म्हणून पर्यावरणाचे नुकसान थांबवू शकतो, असा यातून संदेश देण्यात आला आहे. सोहम पाठक मुख्य भूमिकेत आहे, तर ऋषिकेशची आई शोभा शिंदे लघुपटाच्या निर्मात्या आहेत. कॅनन ७५० डी या कॅमेऱ्यातून चित्रीकरण केले आहे. अवघ्या १० दिवसांत लघुपट तयार झाला. 

साडेसात मिनिटांत पर्यावरण संवर्धनाचा संदेश 
पॉलिथीनलानाहीम्हण्ून आपण पर्यावरण संवर्धनात खारीचा वाटा उचलू शकतो. अवघ्या साडेसात मिनिटांच्या लघुपटात हा संदेश देण्यात आला आहे. ‘दिव्य मराठी’ने कौतुक केलेल्या लघुपटाची राष्ट्रीय महोत्सवासाठी निवड झाल्याचा आनंद होतोय. येथेही ही - फिल्म बक्षीस पटकावेल. -ऋषिकेश दौड, दिग्दर्शक 
बातम्या आणखी आहेत...