आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोट्या जाहिराती करणा-या आघाडी शासनाला धडा शिकवा : नीलम गो-हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - सेल हॉलच्या कामाचे भूमिपूजन करताना आमदार नीलम गो-हे यांच्यासह मान्यवर.)
वैजापूर - मराठवाड्यात पावसाअभावी भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असताना आघाडी सरकारकडून संकटात सापडलेल्या शेतक-यांना मदतीचा आधार देण्याऐवजी प्रगतीच्या खोटारड्या जाहिरातींचा प्रचार-प्रसार करण्यावर भर देणा-या निष्क्रिय सरकारला निवडणुकीत जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गो-हे यांनी वैजापुरात बोलताना केले.

बाजार समितीच्या कांदा खरेदी केंद्रात 20 लाख रुपये खर्चाच्या सेल हॉलचे भूमिपूजन आमदार गो-हे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी आमदार आर. एम. वाणी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. आसाराम रोठे, उपसभापती भागीनाथ मगर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक आनंदी अन्नदाते, माजी नगराध्यक्ष साबेर खान, तालुकाप्रमुख प्रा. रमेश बोरनारे, जि. प. सदस्य दीपक राजपूत, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, माजी जि. प. अध्यक्षा लता पगारे, बाजार समितीचे संचालक महावीर बाफना यांची प्रमुख उपस्थिती होती.