आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरीचा वारकरी आता शहराचा कारभारी, महापौरपदी भाजपचे भगवान घडामोडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापौर तसेच उपमहापौर पदासाठी बुधवारी झालेल्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे युतीचेच उमेदवार विजयी झाले. पुढील साडेदहा महिन्यांसाठी वारकरी संप्रदायाचे पाईक तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भगवान घडामोडे हे शहराचे महापौर (कारभारी)असतील, तर उपमहापौरपदाची धुरा अपक्ष स्मिता घोगरे यांच्या खांद्यावर आली आहे. घडामोडे शहराचे २१ वे महापौर ठरले आहेत. दोघांनीही प्रत्येकी ७१ मते मिळवली. २०१५ मध्ये झालेल्या महापौर निवडणुकीत त्र्यंबक तुपे यांनाही ७१ मते मिळाली होती. त्यामुळे युतीमधील ताणाताणी आणि शिवसेनेतील नव्या विरुद्ध जुन्या नगरसेवकांच्या वादाचा मतांवर परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले.
एक जागा रिक्त असल्याने सध्याच्या ११४ सदस्यांच्या सभागृहात १०७ जणांनी मतदान केले. सदस्य अनुपस्थित, तर तटस्थ राहिले. एमआयएमचे उमेदवार दुसऱ्या, तर काँग्रेसचे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तुपे, राठोड यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक झाली. शिवसेनेतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर युतीच्या उमेदवारांची मते कमी होतात की काय, अशी भीती काहींना होती.

ते आले, त्यांनी मतदान केले अन् चालते झाले
दरम्यान,नंदकुमार घोडेले, विकास जैन, राजू वैद्य या नाराजांवर स्थानिक नेत्यांचे लक्ष होते. अन्य सदस्यांसोबत आम्ही येणार नाही, असे तिघांनी कळवल्याने सकाळपासून त्यांची फोनवरून विचारणा होत होती. हे तिघेही सर्वांच्या आधी सभागृहात पोहोचले अन् मागील बाकावर बसले. उपमहापौरपदासाठी मतदानाला हात उंचावल्यानंतर सरळ घराकडे रवाना झाले.
ज्योती मोरे, अंकिता विधाते, परवीन कैसर खान आणि मुल्ला सलीमा बेगम (राष्ट्रवादी), सुनीता चव्हाण आणि राहुल सोनवणे (बहुजन समाज पक्ष)

अनुपस्थित राहिलेले सदस्य:
खतीजाबेगम (अपक्ष). सभागृहात येण्यास विलंब झाल्याने काँग्रेसच्या वैशाली जाधव या महापौरपदासाठी मतदान करू शकल्या नाहीत. उपमहापौरपदासाठी मात्र त्यांनी मतदान केले.
अपक्ष, पण एकनिष्ठ
स्मिताघोगरे म्हणाल्या की, अपक्ष असले तरी मी शिवसेनेशी एकनिष्ठ आहे. नितीन घोगरे म्हणाले, मी १९८४ पासून शिवसेनेत सक्रिय आहे. वॉर्ड भाजपला गेल्याने अपक्ष लढलो. विजयी होताच सेनेत दाखल झालो. एकनिष्ठांना सेेनेत न्याय मिळतोच. काही जणांच्या नाराजीबद्दल ‘पक्षात असे वाद होतातच,’ अशी टिप्पणी त्यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...