आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरबीअायकडून आले आणखी १२५ कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या अनेक दिवसांपासून आरबीआयकडून मिळणाऱ्या मोठ्या रकमेच्या प्रतीक्षेत असलेल्या बँकांना रविवारी १२५ कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यामुळे रकमेचा तुटवडा असणाऱ्या बँकांना दिलासा मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम शहरातील एसबीआय, एसबीएच, बँक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय, सेंट्रल बँक ऑफ इंडियासह इतर बँकांना दिली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून बँकेत रक्कम मिळत नसल्यामुळे नागरिकांना दोन ते चार हजार रुपयेच मिळत होते. गुरुवारी (८ डिसेंबर) बँक ऑफ महाराष्ट्रला २६ कोटी, एसबीआयला ३० आणि एसबीएचला बारा कोटी मिळाले होते. त्यानंतर रविवारी बँकांना आरबीआयकडून पतपुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये काही प्रमाणात पाचशेच्या नोटाही आहेत. मात्र ही रक्कम शहरासाठी अपुरी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मंगळवारी बँकांना पुरवठा : सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार एसबीआयच्या करन्सी चेस्टला ही रक्कम प्राप्त झाली आहे. त्यानंतर इतर बँकांच्या करन्सी चेस्टला ही रक्कम वितरित केली जाणार आहे. यामध्ये एसबीआयचा वाटा २१ कोटी रुपयांचा आहे. त्यानंतर उर्वरित रकमेचा इतर बँकांना पुरवठा केला जाणार आहे. मंगळवारी बँकांना ही रक्कम वितरित करण्यात येणार आहे.
औरंगाबाद | बँकांनासलग तीन दिवस सुटी असल्यामुळे नागरिकांची भिस्त एटीएमवर आहे. मात्र, एटीएममध्ये रविवारी कॅश भरणा करण्यात आला नसल्याने नागरिक पैशांसाठी मेटाकुटीला आले. शुक्रवारी एटीएममध्ये कॅश भरल्यानंतर शनिवारी पैसे मिळाले. मात्र रविवार भटकंतीत गेला. दरम्यान, सोमवारी एसबीआयच्या एटीएममध्ये कॅश भरली जाणार असल्याने दुपारनंतर एटीएम सुरू होतील, अशी माहिती एसबीआयचे एजीएम नंदकिशोर मालू यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

बँकांना शनिवार ते सोमवार अशा तीन दिवस सुट्या असल्यामुळे एटीएमशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी जे एटीएम सुरू होते तेथे रांगा लागल्याने कॅश संपुष्टात आली. त्यामुळे बहुतेक नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. एसबीएच, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, एच.डी.एफ.सी, अॅक्सिस या बँकांचे एटीएम ड्राय होते. या बँकांनीही शुक्रवारीच कॅश भरली होती.

बातम्या आणखी आहेत...