आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: 500 मीटरचा नियम, आता गावागावांत बार; स्टाॅक संपवण्यासाठी विक्रेत्यांची शक्कल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महामार्गावर खुलेआम दारूविक्री सुरू असल्याचा हा पुरावा. - Divya Marathi
महामार्गावर खुलेआम दारूविक्री सुरू असल्याचा हा पुरावा.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने १ एप्रिलपासून राज्य महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील सर्व बिअर बार, वाइन शॉप बंद करण्यात आलेत. या निर्णयाचा फटका व्यावसायिकांना बसलाय. मात्र, तळीरामांनी काही व्यवसायिकांच्या जाेडीने क्लृप्त्या लढवत उरलेला वैध स्टॉक अवैध मार्गाने विक्री करण्याची नामी शक्कल शाेधून काढली अाहे. अनेकांनी अापले व्यवसाय गुंडाळलेत, तर काहींनी मद्याचा स्टाॅक रिचवण्यासाठी गावागावांतील छाेट्या टपऱ्यांचाही अाधार घेण्यास सुरुवात केलीय. ग्रामीण भागातील मद्यविक्रीचे सत्य उघड करणारी ही बातमी.  
 
ग्रामीण भागात महामार्गावरील प्रवासी पानटपरीवाल्यांमार्फत किंवा चहाटपरी वा एखाद्या दुकानदारामार्फत दारू कोठे मिळती अशी चौकशी करतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. फुलंबी ते सिल्लोड या जळगाव महामार्गावरून औरंगाबादहून मोठ्या प्रमाणावर अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची वर्दळ असते.  पाचशे मीटरच्या नियमामुळे मद्यपी पर्यटकांची मद्यासाठी पळापळ हाेताना दिसत असून महामार्गावरील बार बंद झाल्याने आता गावागावात छाेट्या टपऱ्यांच्या माध्यमातून तसेच देशी दारूच्या दुकानांच्या माध्यमातून मद्य विक्री केली जात असल्याचे दिसत अाहे.   

बार बंदमुळे इंग्लिशपेक्षा देशीकडेच वाढता कल 
महामार्गावरील बार बंद झाल्याने गावागावात देशी दारूची विक्री  वाढत असून विविध माध्यमातून दारू सहज उपलब्ध होत असल्याने मद्यशौकिनांचा कल देशीकडे वाढला असल्याचे चित्र आहे. विदेशी मद्य प्यायचे झाल्यास अवैध मार्गाने जास्तीचे पैसे माेजून ‘इच्छा’ पूर्ण केली जातेय.  
 
हायवेवरील बार आता गावात आल्याने संताप
महामार्गावरील बार बंद झाल्याने अाता बार मालकांनी गावा-गावात दारू दुकाने व बार सुरू करण्याचा धडाका सुरू केल्याने महामार्गावर दारू बंद झाल्याने अानंदीत झालेल्या  विशेषत: महिला वर्गातून संताप व्यक्त केला जाताेय. 
 
अाधी दारूबंदी करा
फक्त हायवेवरील दारूबंदी करून काहीच फरक पडणार नाही.  ग्रामीण भागात बार सुरू होत असून  अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर होते. ती बंद झाली पाहिजे. त्यापेक्षा राज्यात दारूबंदी करावी अशी अपेक्षा आहे. 
- सुनीता बळीराम काकडे, 

गृहिणी, टाकळी कोलते  
-
अवैध दारू विक्री बंद व्हावी म्हणून ग्रामपंचायत, महिला मंडळ ठराव घेऊन संबंधित सर्व कार्यालयांमध्ये पाठपुरावा करतोय.  बारबंदीमुळे तर अवैध दारू विक्रीत वाढ झाली आहे. 
- सोपान काळे, उपसरपंच पीरबावडा
 
पुढील स्लाईडवर वाचा,  भाऊ ‘घेता’ येईल का? जेवण असेल तर ‘घेता’ येईल...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...