आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारंपरिक आणि स्वास्थ्यवर्धक शेवयांना हवे पॅकेजिंगचे कोंदण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- बाजारात विकत मिळणाऱ्या विविध नूडल्सच्या तुलनेत पारंपरिक शेवया अधिक स्वास्थ्यवर्धक आहेत. मात्र, त्यांचे पॅकेजिंग बाजारातील इतर कंपन्यांशी स्पर्धा करणारे नाही. मार्केटिंगसाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत, पण महिन्याला दोन ते अडीच क्विंटलचे उत्पादन करून विक्री करणाऱ्या गृहोद्योगांनी नवा व्यावसायिक मंत्र आत्मसात केला, तर नक्कीच पौष्टिक शेवया लोकप्रिय होतील, असा विश्वास व्यापारी, उद्योगतज्ज्ञांनी व्यक्त केला.
मॅगी नूडल्समध्ये घातक विषारी घटक सापडल्यानंतर विविध मॉल्स आणि दुकानांतून मॅगीला पर्याय म्हणून इतर नूडल्स कंपन्यांची पाकिटे दिसू लागली आहेत. यातील बहुतांश कंपन्या परदेशी आहेत, पण मॅगीमध्ये घातक पदार्थ सापडल्यानंतर इतरही पाकीटबंद उत्पादनांच्या विश्वासार्हतेवर शंका निर्माण झाली आहे. कारण प्रत्येकामध्ये प्रिझर्व्हेटिव्हजचा वापर करण्यात येतो. तेव्हा देशी नूडल्स अर्थात शेवया या उत्तम आणि स्वास्थ्यवर्धक पर्याय आहे. मॅगी प्रकरणानंतर नागरिकांमध्ये नूडल्सबाबत घबराटही निर्माण झाली आहे. तेव्हा शेवयांना याच काळात बाजारपेठ काबीज करण्यासाठी उत्तम संधी आहे. मात्र, पॅकेजिंग नसल्याने आणि मार्केटिंग योग्य प्रकारे होत नसल्याने २० टक्केच विक्री होईल, असे मत व्यापारी विलास साहुजी यांनी व्यक्त केले.
पॅकेजिंगचे प्रकार
प्लास्टिक पॅकेजिंग आणि ड्युप्लेक्स पॅकेजिंग अशा दोन पद्धतींनी पॅकिंग करता येते. प्लास्टिक पॅकेजिंगसाठी ५० ते ६० पैसे खर्च येतो. यासाठी किमान १०० पाकिटे एकावेळी पॅक करावी लागतात. गरवारे आणि कास्मोफिल्मस या कंपन्या यासाठी लागणारी फिल्म तयार करतात. ते १० बचत गट किंवा गृहोद्योग एकत्र आल्यास स्वस्त दरात पॅकेजिंग करून मिळेल. याशिवाय ड्युप्लेक्स पॅकेजिंग हादेखील पर्याय आहे. मात्र, यासाठी ते रुपये खर्च येतो.
पॅकेजिंग किंवा कार्टन बॉक्सेस पर्याय
- महिला बचत गटांनी एकत्रितरीत्या प्लास्टिक पॅकेजिंग केल्यास त्यांना परवडू शकते. याशिवाय कार्टन बॉक्सेसची पॅकिंग हादेखील सुरुवातीच्या काळात उत्तम पर्याय ठरेल. एका ब्रँडच्या नावाखाली सर्वांनी आपल्या शेवयांची पॅकेजिंग केली, तर १०० ग्रॅम पॅकिंगला दीड रुपयांपर्यंत खर्च येईल. माझ्याकडे विविध मसाले, लोणची आणि बेकरी उत्पादनांची पॅकेजिंग केली जाते.
सुभाष चौधरी, सनराइज पॅकेजिंग
ब्रँडिंग गरजेचे
- शहरात तसेच ग्रामीण भागात अनेक महिला बचत गट किंवा लघुउद्योग अत्युच्च दर्जाच्या शेवया उत्पादन करतात. मात्र, त्यांच्यामध्ये संघटितपणा नाही. आपल्या उत्पादनाला प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पॅकेजिंगच्या माध्यमातून ब्रँडिंग करायला हवी.
संजीव उन्हाळे, अध्यक्ष, दिलासा
मॉल्समध्ये दोन क्विंटल माल
- मी गेल्या १२ वर्षांपासून शेवयांचा व्यवसाय करते. शहरातील मॉलसह वाळूजमध्येही शेवया विकते. महिन्याला क्विंटल शेवयांचे उत्पादन करते. शहरात याला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. मात्र, चांगली पॅकेजिंग केल्यास अधिक पसंती मिळेल, त्यादृष्टीने माझा प्रयत्न सुरू आहे.
ऊर्मिला शेळके, संचालिका, कमलनयन फूड प्रॉडक्ट्स
पॅकेजिंग केल्याने १००% फरक पडला
- माझ्या उत्पादनाला जेव्हा विनापॅकिंग विकत होतो, तेव्हा एक उत्पादन विकण्यासाठी मला खूप मेहनत करावी लागत होती. मात्र, जेव्हा मी पॅकेजिंग केली तेव्हा १०० पट फरक जाणवला. माल उत्तम असला तरीही त्याचे प्रेझेंटेशन उत्तम असणे तितकेच गरजेचे आहे.
राजेश सातोनकर, उद्योजक
बातम्या आणखी आहेत...