आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोटीवर होता अनेकांचा डोळा, हिस्सा मिळाल्याने भंडाफोड, पोलिस जमादार थापानेच रचले षड््यंत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जुन्या चलनातील हजार पाचशेच्या नोटा लूट प्रकरण नियोजित कट होता. पैसे लुटल्यानंतर अनेकांचा त्यावर डोळा होता, परंतु जमादार वीरबहादूर ऊर्फ थापा गुरंग याने हा पैसा कुणाच्याही हाती लागू दिला नाही. हिस्सा भेटत नसल्याचे लक्षात आल्यावरच हे बिंग फुटले. प्रकरण पोलिस आयुक्तांपर्यंत गेल्याने थापानेच पुढचे सर्व षड््यंत्र रचून चकलांबा पोलिसांना इतरांची टीप दिली. दरम्यान, यातील फिर्यादी राजेश ठक्कर कुरियर एजन्सीचालक हितेश पुजारा हेसुद्धा समोर येता भूमिगत झाले असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. 

जुन्या नोटा बदलण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०१६ हाेती. त्यानंतर काही निकषांवर नोटा बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. तरीही बाजारात या नोटा बदलून मिळत असल्याचा प्रकार गंभीर असल्याने अनेक प्रश्न पोलिसांसमाेर निर्माण झाले आहेत. त्यामुळे आयकर विभाग सक्तवसुली संचालनालयाला याप्रकरणी चौकशी करण्यासंदर्भात पोलिस पत्रव्यवहार करणार आहेत. थापाच्या संपत्तीच्या चौकशीसाठी लाचलुचपत विभागाकडेही पत्रव्यवहार केला जाणार आहे. 

थापाला पैसे घेण्याचा कुठलाही अधिकार नव्हता, पण त्याने संबंधित माहिती पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना कळवणे अपेक्षित होते, परंतु सर्व पैसे घेऊन परस्पर लांबवण्याचा त्याने प्रयत्न केला. प्रकरण उघड झाल्याचे कळाल्यावर त्याने दुसऱ्यांना गोवण्याच्या उद्देशाने जमील खानकडे साडेनऊ लाख रुपये देऊन चकलांबा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांना टीप देऊन जमीलला अडकवले, परंतु प्रकरण पोलिस आयुक्तांपर्यंत गेल्याचे समजल्यावर थापाने उर्वरित रक्कम सलीम स्टेफनीला देऊन चकलांबा येथे पाठवले होते. स्टेफनीने उर्वरित रक्कम चकलांबा पोलिसांच्या स्वाधीन केली होती. स्टेफनीच्या जबाबाचे पोलिसांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग केले असून तो न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे. 

अनेक प्रश्न अनुत्तरितच 
1) रिझर्व्हबँकेने इतर बँकांना दिलेली मुदत संपल्यानंतरही जुन्या नाेटा कुठे, कोण बदलून देत आहेत ? 
2) ठक्करयाचे पैसे लुटले नसते तर ठक्करला पैसे बदलून देणारी टोळी कोठे कार्यरत आहे ? 
3) थापाएक कोटीची रक्कम कुठून बदलून घेणार होता ? नोटा बदलायच्या नसत्या तर तो त्याचे काय करणार होता ? 
4) गैरमार्गानेपैसे बदलले जात होते तर एक कोटी रुपयांची रक्कम तक्रारदारांकडे कुठून आली ? 

थापा म्हणजे वर्दीतील गुन्हेगार 
यापूर्वीदेखीलथापाची अनेक कामे वादग्रस्त ठरली आहेत, परंतु कुठलेही पुरावे नसल्याने त्याला समज देण्यात आली होती. पोलिस आयुक्तांनी मार्च २०१६ मध्ये उपायुक्त परिमंडळ दोनच्या कार्यालयाला भेट दिली तेव्हा त्याला समज दिली होती. त्यानंतरही त्याच्या संशयित हालचाली सुरूच राहिल्याने त्याची पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली होती. थापा म्हणजे क्रिमिनल इन युनिफाॅर्म असून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिस आयुक्तांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...