आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादः तरुणाने मुलीच्या आईच्या पोटावर केले सपासप वार, म्हणाला- तिला का कोंडता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकतर्फी प्रेमातून एकवीस वर्षीय तरुणाने मंगळवारी भरदुपारी मुलीच्या आईवर चाकूहल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला; परंतु वेळीच परिसरातील नागरिक मदतीला धावून आल्याने महिलेला तत्काळ घाटीत दाखल करण्यात आले. चार महिन्यांपासून गुन्हेगार अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. तिच्या घरच्यांनी त्याला समजावून सांगितले. यापुढे तिच्याशी बोलण्यास मनाई केल्याचा राग धरून त्याने मुलीच्या आईवरच हल्ला केला. मिनाज सिराज काजी (२१, रा. अब्रार कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे.
 
पंधरा वर्षीय मुलगी परिसरातीलच शाळेत शिक्षण घेते, तर आरोपीसुद्धा याच परिसरात राहतो. चार ते पाच महिन्यांपासून मुलगी शाळेतून घरी निघाल्यावर तो तिचा पाठलाग करत होता. तसेच रस्त्यावर एकतर्फी प्रेम व्यक्त करत छेड काढून तिला धमकी देत होता. हा प्रकार मुलीने घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तरुणाला तिच्याशी बोलण्यास मज्जाव केला. काही दिवसांपासून मुलीच्या घरच्यांनी तिला घराबाहेर निघण्यास मनाई केली. त्यामुळे मिनाजने ३१ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता मुलीचे घर गाठले. तिची आई किराणा दुकानात बसलेली होती. आरोपीने तुम्ही तुमच्या मुलीला माझ्यासोबत का बाेलू देत नाहीत, फार बंधन लावता का? असे म्हणत त्याने चाकूचा हल्ला चढवला. सुरुवातीला गालावर नंतर पोटावर वार केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. सहा. पोलिस आयुक्त बाखरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मिनाजला अटक करून न्यायालयात हजर केले. फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे उपनिरीक्षक एस. एस. खरात यांनी सांगितले. 

लोकांनी तरुणाला पकडवून ठेवले 
पीडित मुलीच्या आईवर चाकूहल्ला होताच जखमी महिलेने आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारी धावले आणि हल्लेखोराला पकडून ठेवले. ही माहिती तात्काळ सातारा पोलिसांना दिली. माहिती कळताच सहाय्यक पोलिस आयुक्त एम. बाकरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि हल्लेखोराला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात सातारा पोलिस ठाण्यात कलम ३०७, ३५४ ड, ५०६ बाल लैंगिक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
तुमच्यासोबत असा काही प्रकार घडला असेल तर आमच्यासोबत फेसबुकवर शेअर करा. आम्ही तुमचा अनुभव तुमचे संपूर्ण नाव न सांगता पब्लिश करु. त्यातून इतरांनाही संदेश देता येईल. या समस्येवर मार्ग कसा काढावा याचे मार्गदर्शन करता येईल.
facebook.com/Marathi.Divya/
 
पुढील स्लाईडवर वाचातत्काळ पोलिसांना कळवा...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...