आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रोबोटिक तंत्रज्ञानाने टाळता येईल हृदयाची ‘ओपन हार्ट सर्जरी’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हृदयाची‘ओपन हार्ट सर्जरी’ करताना ते इंचांपर्यंत टाके पडतात. फासळ्यांतील हाडे कापून ही शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे रोबोटद्वारे ही शस्त्रक्रिया एक इंच जागेतून यशस्वीपणे करता येऊ शकते. पूर्ण शरीराची चिरफाड करण्याची गरजच उरणार नाही. याशिवाय कर्करोगामुळे शरीरात तयार होणाऱ्या ट्यूमरच्या गाठी अतिसूक्ष्म स्तरावर काढून या रोगाचे समूळ उच्चाटन करता येईल. लवकरच हे तंत्रज्ञान औरंगाबादेतही उपलब्ध होईल, असे संकेत युनायटेड सिग्मा रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. उन्मेश टाकळकरांनी दिले.
रोबोटद्वारे शस्त्रक्रियेचे प्रात्यक्षिक रविवारी, २० नोव्हेंबरला युनायटेड सिग्मा रुग्णालयात दाखवण्यात आले. रुग्णालयाचे सीईओ डॉ. अजय रोटे, डॉ. बालाजी आसेगावकर , डॉ. मनीषा टाकळकर, डॉ पुष्पा कोडलीकेरी, डॉ उद्धव राज, डॉ. आनंद देवधर, डॉ. उमेश कुलकर्णी, डॉ. अभिलाष उपासनी उपस्थित होते.

चार हात आणि थ्रीडी तंत्र असलेल्या या रोबोटच्या माध्यमातून अचूक शस्त्रक्रिया कशी करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. ११ ते १२ कोटी रुपये किमतीच्या रोबोटमुळे शस्त्रक्रियेच्या दरात फार मोठा बदल होणार नसला तरी साधारपणे केल्या जाणाऱ्या दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेपेक्षाही यामध्ये अधिक अचूकता साधता येईल. दुर्बिणीच्या शस्त्रक्रियेत रुग्णाला किमान तीन दिवस रुग्णालयात राहावे लागते. तर रोबोटिक शस्त्रक्रियेनंतर कमी वेळात रुग्णाला घरी जाता येईल. याशिवाय यामुळे निर्जंतुकीकरणही अधिक अद्ययावत होऊन रुग्णाला लवकर बरे करता येईल, असे डॉ. टाकळकर म्हणाले.

Ã२००० पासून रोबोटद्वारे शस्त्रक्रियांचे तंत्र वापरात आहे. दिल्लीत सर्वप्रथम अशी शस्त्रक्रिया सुरू झाली होती, तर मुंबईत वर्षांपासून रोबोटद्वारे शस्त्रक्रिया होत आहेत. मात्र, आता ती सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ शकणार आहे. थर्ड जनरेशनचा हा रोबोट कुशलतेने तज्ज्ञ डॉक्टर हाताळतील. रोहित गुप्ता, तंत्रज्ञ

रक्तस्रावही कमी होणार
Ãरोबोटिक शस्त्रक्रियेमुळे रक्तस्राव कमी होईल. याशिवाय कर्करोगात ट्यूमर काढताना सूक्ष्म स्तरावर बॅक्टेरिया राहिले तर पुन्हा ट्यूमर बळावतो अन् शस्त्रक्रियेची वेळ येते. पण रोबोटमुळे सूक्ष्मस्तरावर शस्त्रक्रिया करता येईल. पुन्हा ट्यूमरची शक्यता राहणार नाही. याशिवाय शस्त्रक्रियेसाठी चिरफाड करण्याची गरज उरणार नाही. कमी दिवसांत रुग्ण घरी परतेल. डॉ.अजय रोटे, सीईओ सिग्मा

बातम्या आणखी आहेत...