आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक मुलगा गमावलेल्या मातेने केले दुसऱ्याचे अवयवदान, ब्रेन डेड तरुणाची किडनी, हृदय, यकृत घाटीत दान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अाठच दिवसांपूर्वी मी मिलिंदसाठी सोलापूरची मुलगी बघ्ून आले होते. त्यालाही ती बघण्यास सांगितले. पण त्याने मी आत्ताच लग्न करणार नाही. आधी मला गावात घर बांधायचे, असे सांगितले. मी त्याच्या लग्नाचे स्वप्न रंगवत होते. मात्र आज त्याचे कलेवर पाहण्याची वेळ आली. पण त्याचे अवयव चार जणांचा जीव तारणार ही कल्पनाही माझ्या मनाला समाधान देणारी आहे, अशी भावना व्यक्त करत वृद्ध पुष्पा हेलवाडे यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आधीच एक मुलगा गमावल्यानंतर त्यांनी अपघातानंतर ब्रेन डेड झालेल्या दुसऱ्या मुलाच्या अवयवदानाचा निर्णय काळजावर दगड ठेवून घेतला. 

२६ फेब्रुवारी २०१६ रोजी गणेश घोडकेचे यशस्वी अवयवदान केल्यानंतर वर्षभरानंतर फुलंब्री तालुक्यातील पाथ्री येथील ३५ वर्षीय मिलिंद मनोहर हेलवाडे यांचे २१ फेब्रुवारीला यशस्वी अवयवदान करण्यात आले. त्यांचे हृदय आणि यकृत मुंबईतील ग्लोबल आणि फोर्टिस रुग्णालयाला देण्यात आले, तर दोन्ही किडन्या शहरातील एमजीएम बजाज रुग्णालयात प्रत्यारोपित करण्यात आल्या. कॉर्निया घाटीच्या नेत्र विभागात देण्यात आले. पुष्पा हेलवाडे यांनी क्षणार्धात अवयवदानाचा निर्णय घेत इतर चार जणांच्या रूपात आपल्या मुलाचे अवयव जीवित ठेवले. 

दहावीपर्यंत शिक्षण झालेले मिलिंद पूर्वी विप्रो कंपनीत नोकरीला होते. काही काळ नाशिकच्या महिंद्रा कंपनीत काम केल्यावर ते शहरात रिक्षा चालवत होते. गावातील शेतीत भाऊबंदकीचे वाद सुरू असल्याने त्यांनी या नोकऱ्या पत्करल्या होत्या. मात्र, न्यायालयामार्फत एकर शेती वर्षांपूर्वी मिळाल्यानंतर त्यांनी शेती करण्यावर भर दिला. फुलंब्री तालुक्यातील पाथ्री गावात गिरजा नदीकाठी कऊटखेडा फाट्याजवळ त्यांची शेती आहे. 

रविवारी (१९ फेब्रुवारी) शेतात जाण्यासाठी ते रस्ता ओलांडत होते. तेव्हा अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. सायंकाळी ५.३० च्या सुमारास घाटीत दाखल करण्यात आले. रुग्णवाहिका चालकाने शहरात राहत असलेला मिलिंदचा मोठा भाऊ शरद यांना घटनेची माहिती दिली तेव्हा अाई पुष्पासोबत ते घाटीत दाखल झाले. शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. सुरेश हरबडे यांनी मिलिंदवर उपचार केले. मात्र, मेंदू मृत झाल्याचे लक्षात येताच २० फेब्रुवारीला दुपारी ब्रेन स्टेम डेथ तपासणी समितीला कळवले. दुपारी वाजता समितीने पाहणी केली. सायंकाळी वाजता दुसरी तपासणी केली. ब्रेन डेडची खात्री झाल्यानंतर विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीला माहिती कळवण्यात आली. त्यानुसार वेगवान यंत्रणा फिरवण्यात आली अन् मुंबईतील तज्ज्ञ हृदय आणि यकृत नेण्यासाठी सकाळच्या सुमारास शहरात आले. सकाळी वाजून ३० मिनिटांनी अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू झाली. ११ वाजून ४४ मिनिटांपर्यंत हृदय, यकृत आणि दोन्ही किडन्या घेऊन पथके रवाना झाली होती. 

समुपदेशनानंतर लगेच दिला होकार
ब्रेनडेड असल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांना अवयवदानासाठी प्रोत्साहित करण्याचे काम घाटीतील समाजसेवक नीलेश कोतकर आणि अभिजित साबळे यांनी केले. त्यांनी पुष्पा हेलवाडे यांना अवयवदानाविषयी सविस्तर माहिती िदली असता पुष्पा यांनी लगेच होकार दिल्यानंतर अवयवदानाच्या प्रकियेला वेग आला. 
 
...तर गरिबांना मिळतील अवयव 
घाटीतर्फे ४४९ रिक्त तसेच नव्या पदांसाठीचे प्रस्ताव पाठवले आहेत. विशेषज्ञांअभावी मूत्र विभाग कार्यरत नाही. या पदांना मंजुरी मिळून भरती झाली तर घाटीत अवयव काढण्यासोबतच प्रत्यारोपणही शक्य होईल. यामुळे दळणवळणाचा खर्च तर वाचेलच; शिवाय गरिबांना अवयव मिळतील. यासाठी लोकप्रतिनिधींनी पदभरतीचा प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. मूत्र विभाग किंवा हृदय विभागात विशेषज्ञ असते तर घाटीतच गरीब रुग्णाला हृदय किंवा किडनी देता आली असती. 

...अन् लिफ्ट बंद झाली 
घाटीत समस्या कायम ठाण मांडून असतात. अशा परिस्थितीतही दुसरे अवयवदान यशस्वी झाले. हृदय घेऊन गेल्यानंतर काही मिनिटांत यकृत नेण्यासाठी टीम शस्त्रक्रियागाराबाहेर पडली अन् नेहमीप्रमाणे घाटीची लिफ्ट बंद पडली. पण यंत्रणा तयार असल्याने जिन्याच्या मार्गाने यकृत नेण्यात आले.
 
डॉक्टरांची टीम 
हृदयकाढण्याच्या प्रक्रियेत डॉ. आनंद देवधर, डॉ. संदीप सिन्हा, यकृतासाठी डॉ. प्रशांत राव, डॉ. अरुण के., किडनीसाठी डॉ. अभय महाजन, डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. अजय ओसवाल, डॉ. प्रशांत दरक, डॉ. आवरगावकर यांचा सहभाग होता. ब्रेन डेथ टीममध्ये डॉ. मकरंद कांजळकर, डॉ. जीवन राजपूत, डॉ. प्रभाकर जिरवणकर, डॉ. सुहास जेवळीकर, डॉ. सुधीर चौधरी यांचा समावेश आहे. 

नर्सिंगस्टाफ अन् चतुर्थश्रेणीचे श्रम 
अवयवदानप्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्यानंतर रुग्णाला स्थिर ठेवणे आणि इतर पथकांशी चर्चा, शस्त्रक्रियागार तयार करणे, नातेवाइकांची काळजी घेणे अशा सर्व बाबी समांतर सुरू होत्या. यात घाटीचा नर्सिंग स्टाफ आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभावल्याचे डॉ. सुधीर चौधरी यांनी सांगितले. 

कौटुंबिक पार्श्वभूमी 
मिलिंदभावंडातील सर्वात लहान होते. मोठे भाऊ शरद हेलवाडे मिल कॉर्नर परिसरात राहतात. लहान भाऊ विनायक यांचा आजाराने मृत्यू झाला. बहीण सीमा सुरतमध्ये राहतात. 

पाथ्रीत अपघात 
मिलिंदहेलवाडे रविवारी दुपारी शेतीत जाण्यासाठी निघाले होते. रस्ता ओलांडताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...