आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंद्रिय पद्धतीतील भाजीपाल्याला अधिक महत्त्व, विषमुक्त भाजीपाला विक्रीस औरंगाबादेत सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विषमुक्त भाजीपाल्याची विक्री व प्रदर्शनास राज्य माहिती आयुक्त दिलीप धारुरकरांचे हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर. - Divya Marathi
विषमुक्त भाजीपाल्याची विक्री व प्रदर्शनास राज्य माहिती आयुक्त दिलीप धारुरकरांचे हस्ते फित कापून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर.
कन्नड  - व्यायाम, योगा व आयुर्वेदिक औषधीतून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. मात्र, अन्नात व भाजीपाल्याच्या अनेक विषारी घटक बेमालूमपणे मिसळले जात असल्याने यावर आपले नियंत्रण असू शकत नाही. यासाठी आधुनिक जीवनशैलीत सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला भाजीपाला व अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आले असल्याचे मत राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी व्यक्त केले.   कन्नड येथील पारिजात व परिपूर्ती नॅचरल फार्मिंग क्लबच्या वतीने उत्पादित विषमुक्त सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या भाजीपाला विक्रीचा शुभारंभ औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशन संस्थेच्या दालनात पतंजली योग समितीच्या वतीने  रविवारी करण्यात आला. याप्रसंगी धारूरकर बोलत होते.  
 
विषमुक्त सेंद्रिय भाजीपाल्याचे प्रदर्शन, विक्रीचे उद््घाटन  राज्य माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भारत स्वाभिमान प्रांत प्रभारी मिलिंद शुक्ल, पतंजली योग समितीचे केंद्रीय कॉर्पोरेट सदस्य मनास यांची प्रमुख उपस्थिती होती.  प्रगतिशील शेतकरी अजय जाधव व भाऊसाहेब थोरात यांच्या पुढाकारातून कन्नड तालुक्यात ११०  प्रकारच्या विविध पालेभाज्या, फळभाज्यांसह फळे, पापड, लोणचे उत्पादित करण्यास सुरुवात झाली असून औरंगाबाद शहरातील ग्राहकांस घरपोच देण्यात येणार आहे.  उद््घाटनास जिल्हा युवा प्रभारी कैलास पवार, जिल्हा कार्यालय प्रभारी रमाकांत देसाई, जिल्हा महिला पतंजली योग समितीच्या दीप्ती राठोड, महाराष्ट्र पश्चिम मंडल प्रभारी तथा जिल्हा किसान सेवा समिती प्रभारी शिवाजीराव कावडे, योग शिक्षक डॉ. यशवंत पवार, आर्ट ऑफ लिव्हिंग तथा पारिजात आणि परिपूर्ती नॅचरल फार्मिंग क्लबचे अध्यक्ष भाऊसाहेब थोरात, पतंजली योग समितीचे तालुका प्रभारी विठ्ठलसिंग, भारत स्वाभिमानचे  तालुका प्रभारी करणसिंग राजपूत,  शिक्षक आघाडे, भारत स्वाभिमानचे सदस्य डॉ. चंद्रकांत देशमुख, कन्नड युवा प्रभारी शहरप्रमुख नारायण जाधव, पिशोर युवा भारतचे गोपाल परदेशी आदी उपस्थित होते.   प्रेमसिंग बैनाडे यांनी आभार मानले.
बातम्या आणखी आहेत...