आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच दिवशी ऐंशी टन मोसंबीची आवक, पाचोडला मोसंबी मार्केट सुरू, ९ ते १३ हजार रुपयांपर्यंत भाव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड- या हंगामातील मृग मोसंबी निघण्यास सुरुवात झाली आहे. मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी पैठण तालुक्यातील पाचोड  येथील मोसंबी मार्केटमध्ये विक्री करण्यास सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी ८० टन मोसंबीची आवक झाल्याची नोंद झाली आहे. रविवारी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू पाटील भुमरे यांच्या हस्ते पहिली बोली लावण्यात येऊन मोसंबी  खरेदी-विक्रीला सुरुवात करण्यात आली. 
 
यंदा पाऊस चांगला झाल्याने मोसंबीचे उत्पादन भरघोस निघणार आहे. तसेच सरत्या वर्षाच्या  शेवटी आंब्या मोसंबी पन्नास  हजारांवर जाऊन पोहोचली होती. नोटबंदीचा निर्णय जाहीर होताच दर गडगडले, परिणामी शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सध्या उत्तर भारतात थंडीचा जोर वाढल्यामुळे मोसंबीच्या मागणीत घट झाल्याने मोसंबीला आज रोजी नऊ हजार ते तेरा हजारांपर्यंत भाव मिळत आहे. गतवर्षी मोसंबीला चांगले दर मिळाल्याने  मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.  

मोसंबी खरेदी-विक्री करण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी, व्यापारी हजर होते. आता मृग हंगामास सुरुवात झाल्याने मोसंबी मार्केटमध्ये आवक दिवसेंदिवस वाढणार असून परराज्यांतील मोसंबीचे व्यापारी येथे मोसंबी खरेदीसाठी येतील.   या कार्यक्रमास पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक महेश आंधळे,  मनोज गटकाळ सर, थोरे,  शिवराज भुमरे, व्यापारी संघाचे अध्यक्ष रय्यासुदीन बागवान, सचिव इलियासभाई, फारुखशेठ, गणीभाई, अस्लमभाई, मन्नानभाई, रंजित नरवडे, इरफान शेख, जावेद शेख, अक्तरभाई, बाबा कदम, जाबेरभाई, आश्पाक बागवान, बाळू भालसिंगे, काशीनाथ बोरकर, अब्बुभाई बागवान, बप्पासाहेब चावरे, युवराज चावरे, शफीक बागवान, जाकेर आत्तार, फिरोज आत्तार, विनोद मोटकर उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...