आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक: पंचायत समितीच्या उमेदवारांवर संक्रांत, निवडणूक |पंचायत समितीचे 24 अर्ज बाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी तहसील परिसरात उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान झालेली कार्यकर्त्यांची गर्दी - Divya Marathi
वडवणी तहसील परिसरात उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान झालेली कार्यकर्त्यांची गर्दी
बीड - जिल्ह्यातील ६० जिल्हा परिषद १२० पंचायत समितीच्या गणांच्या उमेदवारी अर्जांची गुरुवारी रात्रीपर्यंत छाननी सुरू होती. बीड तालुक्यात पाच, वडवणीत तीन अंबाजोगाईत, धारूरमध्ये प्रत्येकी दोन अर्ज बाद ठरले, तर पाटोदा तालुक्यात मात्र सहा पंचायत समिती गणातील १२ अपक्ष सदस्यांचे अर्ज बाद ठरल्याने संक्रांत ओढावली आहे. माजलगाव तालुक्यात मात्र जिल्हा परिषदेत गटात एकही उमेदवाराचा अर्ज बाद झाला नाही. जिल्ह्यातील सात तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या ३, तर पंचायत समितीच्या २४ उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. 
वडवणी तालुक्यात सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेल्या उपळी गटातील मनसेच्या रंजना श्रीराम बादाडे यांच्या तीनपैकी दोन अर्जांवर एकच सूचक असल्याने त्यांचा एक अर्ज छाननीत बाद झाला, तर दुसरे दोन्ही अर्ज वैध ठरलेले आहेत, तर चिंचवण गणातील भाजप जनविकास अाघाडीच्या शांताबाई राठोड यांच्या दोन्ही अर्जांवर एकच सूचक होता. त्यामुळे भाजपकडून दाखल केलेला त्यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरला आहे. उपळी पंचायत समिती गणासाठी जनविकास आघाडीच्या अाशा गणेश सावंत यांचा अर्ज सही (स्वाक्षरी) नसल्याने बाद ठरवण्यात आला. त्यामुळे ७१ उमेदवारांनी एकूण ८१ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ७८ अर्ज वैध ठरले. केवळ उमेदवारी अर्ज बाद झाले. गटांसाठी २१ महिलांचे उमेदवारी अर्ज वैध, तर चार गणांत ३६ महिलांचे १३ पुरुषांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले. फेब्रुवारी रोजी अर्ज मागे घेण्यासाठी उमेदवारांची मनधरणी सुरू आहे. 

गेवराई : सूचक नसल्याने महिला उमेदवाराचा अर्ज बाद 
तालुक्यातील गटांसाठी ८९, तर १८ गणांसाठी १८५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गणातील सूचक नसल्याने एका महिला उमेदवारांचा अर्ज छाननीत बाद ठरला असल्याने पंचायत समिती गणासाठी १८४ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. जिल्हा परिषदेचे नऊ गट, तर पंचायत समितीच्या १८ गणांसाठी एकूण २७४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. येथील नगर परिषद कार्यालयातील छाननीत तलवाडा गटातील अंतरवाली गणाच्या किसकिंदा शिंगणे यांचा अर्ज सूचक नसल्याने बाद ठरवण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सुरवसे एम. बी. यांनी सांगितले. 

अंबाजोगाई : तालुक्यात एका अर्जावर सुनावणी सुरू 
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा गटांसाठी ७२ उमेदवारांनी ७९, तर पंचायत समितीच्या बारा गणांसाठी १३१ उमेदवारांनी १५२ अर्ज दाखल केले होते. बुधवारी जवळगाव गणातील पांडुरंग दहिवाडे बंडू उदार या दोघांचे अर्ज अवैध ठरले असून जवळगाव पंचायत समिती गणातील एका अर्जावर सुनावणी सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सहा गटांसाठी ७२ उमेदवारांनी ७९ अर्ज, तर पंचायत समितीच्या बारा गणांसाठी १३१ उमेदवारांनी १५२ अर्ज दाखल केले होते. 

बीड तालुक्यातील पाच अर्ज छाननीत बाद 
बीड- बीड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती गणातील पाच उमेदवारांचे अर्ज गुरुवारच्या छाननीत बाद ठरले आहेत. तालुक्यातील लिंबागणेश जिल्हा परिषद गटासाठी अपक्ष म्हणून निकिता स्वप्निल गलधर यांनी दाखल केलेला अर्ज वय कमी असल्याने बाद झाला आहे. पाली पंचायत समिती गणातील अपक्ष उमेदवार रखमाजी पिराजी देवकर यांचा अर्ज शाैचालय प्रमाणपत्र नसल्याने, तर बहिरवाडी गणातील अपक्ष शेख फराह बेगम अकबर यांच्या अर्जावर सूचकाची स्वाक्षरी नव्हती. एमअायएम पक्षाकडून बहिरवाडी गणातून पठाण रशिदाबी अय्युब खान यांच्या अर्जासोबत मूळ ग्रामपंचायतीचा ठराव नव्हता, तर चाैसाळा गटातून महेंद्र बाेराडे यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्ज अाॅफलाइन त्रुटी असल्याने बाद झाला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास माने, सहायक म्हणून तहसीलदार छाया पवार यांनी काम पाहिले. 

धारूर : दोन अर्ज बाद : येथीलपंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या ११८ उमेदवारी अर्जांची छाननी गुरुवारी सकळी ११ ते दुपारी वाजेपर्यंत करण्यात आली. यामध्ये पंचायत समितीसाठीचे दोन अर्ज अवैध करण्यात आले. धुनकवाड गणातील थोरात प्रमाबाई महादेव यांचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला, तर आसरडोह गणातील राधाकिशन देवराव गडदे यांचा नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी नसल्याने अर्ज बाद ठरवण्यात आला आहे. छाननीत अंतिम गणांत आलेल्या एकूण ८० पैकी ७८ उमेदवारी अर्ज वैध ठरले असून तीन गटांत ३८ अर्ज वैध ठरले आहेत. 
 
पाटोदा : तालुक्यात अपक्षांवर संक्रांत 
पाटोदा तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गटांतील ५६ अर्जांपैकी मधुकर येवले, शिवाजी भोसले, उबेदखान पठाण, मथुरा गायकवाड, किरण बांगर असे अर्ज बाद झाले असून सहा पंचायत समितीच्या गणांतील ११७ अर्जांपैकी १२ अपक्षांचे अर्ज बाद झाले आहेत. 

माजलगाव : तालुक्यात सर्वच गटांत अर्ज शाबूत 
माजलगावतालुक्यातील सहा गटांत १३२ अर्ज दाखल झाले होते. दरम्यान, गुरुवारी येथील तहसील कार्यालयात सकाळी अकरा वाजता छाननीला सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत एकही अर्ज बाद झाला नाही. 

शिरूर : पंचायत समितीचे दोन अर्ज बाद 
तालुक्यातील गटांपैकी एकाही ठिकाणचा अर्ज बाद झाला नाही. पाडळी पंचायत समिती गणातून काकू-नाना विकास आघाडीचे उमेदवार आर्वी येथील अशोक नन्नवरे यांचा अर्ज घोषणापत्रावर स्वाक्षरी नसल्याने अवैध ठरला, तर राक्षसभुवन गणातून संतोष कांबळे यांचा अर्ज बाद झाला.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...