आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी, विषय समिती सभापती बिनविरोध, कन्नड पालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदी युवराज बनकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड  - नगर परिषदेच्या स्थायी समिती व विषय समितीच्या सभापतींची निवड बुधवारी (२२ फेब्रुवारी)बोलाविण्यात आलेल्या विशेष सभेत करण्यात आली. नपच्या सभागृहात झालेल्या या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉ श्रीमंत हारकर होते.  यावेळी नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, मुख्याधिकारी संतोष आगळे, काँग्रेसचे गटनेता संतोष कोल्हे, उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद यांसह नगरसेवक उपस्थित होते.
 
विषयसमितीच्या सभापतींच्या निवडीनंतर सर्व सभापती आणि सदस्यांचा नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, संतोष कोल्हे यांनी सत्कार केला या वेळी रवींद्र राठोड, प्रेमसिंग राजपूत, अनिल कोल्हे, अमोल पवार, उद्धव पवार, कृष्णा विसपुते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. पीठासन अधिकारी यांना मुख्याधिकारी संतोष आगळे सह प्रशांत देशपांडे, देविदास पाटील नप कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
 
- स्थायी समिती सभापती : युवराज बनकर सदस्य : संतोष कोल्हे, गोविंद भारुका. 
 
- बांधकाम समिती सभापती : अब्दुल जावेद सदस्य- अनिता कवडे, फकिरा रंगरेज, नाजिया बेगम शेख, कविता पंडित.
 
- शिक्षण व नियोजन समिती सभापती : विद्या काशीनंद सदस्य : स्वाती पवार, अनिता कवडे, मंदाबाई शिंदे, कविता पंडित.
 
- स्वच्छता व आरोग्य समिती सभापती: शेख अजीज सदस्य : रंजना राठोड, फकिरा रंगरेज, उलफ्तबी पटेल अजमल खान.
 
- पाणी पुरवठा समिती सभापती : कैलास जाधव सदस्य : रंजना राठोड, फकिरा रंगरेज,स्वाती पवार, अनिता कवडे.
 
- नियोजन व विकास समिती सभापती : अनिल गायकवाड सदस्य : रंजना राठोड, स्वाती पवार, नाजिया बेगम शेख, गोविंद भारुका.
- महिला व बालकल्याण समिती सभापती : फरहानाज शेख सदस्य :उलफ्तबी पटेल, लक्ष्मीबाई शिरसे, कविता पंडित, मंदाबाई शिंदे.
 
 
 
बातम्या आणखी आहेत...