आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांगरमल: पोलिसांवरील कारवाई वादाच्या भोवऱ्यात, चुकीच्या लोकांवर कारवाई केल्याची चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पांगरमल दारुकांडानंतर एका महिला फौजदारासह दहा पोलिसांवर केलेली कारवाई आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. निलंबन केलेल्या कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवल्याची चर्चा पोलिस वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र, ही कारवाई अंतिम नसून आणखी काही जणांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे संकेत वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. निलंबन केलेल्या पोलिसांपैकी काही जणांनी या आदेशाविरुद्ध दाद मागणार असल्याचेही सांगितले आहे. 

पांगरमल (ता. नगर) दारुकांडात जणांचे बळी जाऊनही पोलिसांवर कारवाई झालेली नसल्याचे ‘दिव्य मराठी’ने मार्चच्या अंकात म्हटले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच शुक्रवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी तोफखान्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक अर्चना करपुडे यांच्यासह दोन हवालदारांना निलंबित केले, तर तोफखाना, एमआयडीसी स्थानिक गुन्हे शाखेच्या सहा कर्मचाऱ्यांच्या पोलिस मुख्यालयात बदल्या केल्या. मात्र, या कारवाईमुळे आश्चर्य व्यक्त झाले आहे. 

पांगरमल गावातील मृत्यूकांड बनावट दारूमुळेच घडल्याचे निष्पन्न झाले. बनावट दारूनिर्मितीचे रॅकेटही उजेडात आले. यामध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविकेचा पुत्र जितू गंभीर याच्यासह कथित पत्रकार जाकीर शेख यांना आरोपी करण्यात आले. या आरोपींसोबत काही पोलिसांचे माेठ्या प्रमाणावर संपर्क सख्य असल्याची सुरुवातीपासून चर्चा होती. संबंधितांची चौकशी झाली. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनीही याबाबत झाडाझडती घेतली होती. 

प्रत्यक्षात मात्र, वेगळ्याच पोलिसांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळली असल्याचे म्हटले जात आहे. ज्या पोलिसांना रॅकेटचा मागमूसही नव्हता, त्यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड, तर ज्यांचे आरोपींसोबत नेहमीचे उठणे-बसणे होते, त्यांच्यावर सोयीस्करपणे बदलीची कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. शनिवारी दिवसभर पोलिस वर्तुळात याबाबतच चर्चा होती. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वत:ला ‘सेफ’ ठेवण्यासाठी आरोपींसोबत सख्य ठेवणाऱ्या पोलिसांना अभय दिल्याचेही म्हटले जात होते. 
 
पुढील स्लाइडवर वाचा जितू गंभीरसह आरोपींना पुन्हा मिळणार पोलिस कोठडी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)​ 
बातम्या आणखी आहेत...