आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोटणजवळ शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रक रोखला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- एकाही कारखान्याने उसाचे हमी भाव जाहीर केले नसल्याने शहरात आज शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पैठण - शेवगाव जवळील घोटण येथे पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या  उसाचे वाहन रोखल्याने उसाच्या हमी भावासाठी शेतकरी आक्रमक झाल्याचे आज पाहायला मिळाले.

पैठण तालुक्यातील पाटेगाव येथे पाच दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेने साखर कारखानदारांना पाच दिवसांत हमी भाव जाहीर करण्याची मागणी केली होती. आज पाच दिवस संपले. मात्र एकाही कारखान्याने उसाला भाव जाहीर न केल्याने घोटण येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत उसाच्या गाड्या रोखल्या. साखर कारखान्यांनी केंद्र सरकारच्या हमी भावाप्रमाणे उसाला किमान दर द्यावा, अन्यथा तालुक्यातून उसाचे एकही टिपरू नेऊ देणार नाही, असा इशारा शेतकरी नेत्यांनी या वेळी दिला. पैठण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पाटेगाव येथे मेळावा रविवारी घेण्यात आला. यावेळी रवींद्र शिसोदे, अन्नदाता शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष माऊली मुळे, शिवाजीराव साबळे, चंद्रकांत झारगड, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भाऊसाहेब पिसे आदींच्या उपस्थित शेतकऱ्यांनी हमी भाव जाहीर होईपर्यंत ऊस  कारखान्याला न देण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते  रवींद्र शिसोदे यांनी पैठण तालुक्यातील ऊस अहमदनगर जिल्ह्यातील साखर कारखाने कोणताही दर घोषित न करता तोडून नेत आहेत. मात्र या कारखानदारांनी प्रथम केंद्र सरकारच्या हमी भावाप्रमाणे दर घोषित करावा.  तालुक्यातून उसाचे टिपरूही नेऊ देणार नाही, असा इशारा दिला. उसाच्या दराबाबत सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय या मेळाव्यात घेण्यात आला. यावेळी माऊली मुळे, चंद्रकांत झारगड, भाऊसाहेब पिसे  यांचीही भाषणे झाली. या मेळाव्यास नगरसेवक ज्ञानेश घोडके, सलीम शेख, बद्रीनाथ बोंबले, राजू वीटभट्टीवाले, अप्पास,  संजय मोरे, भरत चोरमले, संजय म्हस्के, बापूराव डोईफोडे, संतोष देशमुख, लक्ष्मण गायके, शिवाजी साबळे, रावसाहेब लवांडे, दत्ता फुंदे , भीमराव भडके, भाऊसाहेब ढोले, शिवाजी भोसले, संतोष गायकवाड, अमोल नेमाने, राजेंद्र गर्जे, गोवर्धन कनसे, रावसाहेब जायभाये, रवींद्र कोकाटे, सय्यद पाशा, गणेश खेडकर, नारायण म्हस्के, हरिश्चंद्र बारगजे, महादेव भोसले  आदींसह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...