आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे, मद्रास आणि जयपूरसह दिल्लीपर्यंत दौरे लाखो रुपयांचा खर्च; शहरातील खड्डे कायम!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेटपॅच यंत्र - Divya Marathi
जेटपॅच यंत्र

औरंगाबाद- खड्डे, पॅचवर्क हा विषय आता घासून गुळगुळीत झाला आहे. वर्षानुवर्षे ही समस्या कायम आहे. दरवर्षी मीडियातून बातम्या प्रसिद्ध होतात. नागरिक संताप व्यक्त करतात. वेळोवेळी पदाधिकारी व अधिकारी आपापल्या कार्यकाळात नवीन तंत्रज्ञान आणण्याची भाषा करतात. गेल्या तीन-चार वर्षांत रस्ते दुरुस्तीसाठी नवनवीन प्रस्ताव आले.

 

अधिकारी-पदाधिकारी त्यासाठी धुळे, पुणे, मद्रास, जयपूर आणि अगदी थेट दिल्लीपर्यंत जाऊन आले. त्या त्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रण देण्यात आले. या दौऱ्यात आणि प्रात्यक्षिकांमध्ये लाखो रुपये खर्च झाले. मात्र, कुणीच गंभीर नसल्याने हे सारे प्रस्ताव बारगळले. त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे मात्र कायम आहेत.

 

जेटपॅच यंत्र

विजय वाघचौरे  हे स्थायी समिती सभापती असताना त्यांच्या कार्यकाळात ८ नोव्हेंबर २०१४ रोजी शहरातील  खड्डे योग्य तंत्रानेे बुजवण्यासाठी जेटपॅच यंत्राचा विचार करण्यात आला. अधिकारी-पदाधिकाऱ्यांचे पथक धुळ्याला गेले होते. त्यानंतर धुळ्याचे पथकाने  क्रांती चौकात प्रात्यक्षिक करून दाखवले .ही यंत्रणा खरेदी करण्यासाठी तत्कालीन आयुक्त प्रकाश महाजन यांनी प्रस्ताव तयार केला. त्यवर  अनेक दिवस चर्चा झाली. मात्र, नंतर त्याचा कुणी पाठपुरावाच केला नाही.

 

माझा काहीही दोष नाही
जेटपॅच यंत्राचा विचार करण्यात आला होता. तो योग्यच होता. पण प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे ही चांगली संकल्पना मला सोडावी लागली. यात माझा काय दोष?
- विजय वाघचौरे, तत्कालीन सभापती

 

पुढील रस्‍त्‍यावर वाचा, खड्डे बुजवण्‍यायाठी आलेले प्रस्‍ताव व ते का बारगळले?

 

बातम्या आणखी आहेत...