आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: मुख्य लेखाधिकारी पवार म्हणाले, ‘त्या’ फायली स्वीकारणार नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ठेकेदार रामदास ठोंबरे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गठित चौकशी समितीने ताब्यात घेतलेल्या फायली आज लेखापरीक्षक विभागाच्या वतीने बुधवारी परत पाठवण्यात आल्या. परंतु मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी त्या ताब्यात घेण्यास नकार दिला. नेमक्या किती फायली तुम्ही नेल्या होत्या याची नोंद माझ्याकडे नाही. त्यामुळे या संचिका कशा ताब्यात घेऊ, असा सवाल त्यांनी केला. 
 
२४ जानेवारीला आयुक्तांच्या आदेशावरून चौकशी समितीने लेखा विभाग सील केला होता. त्यानंतर २५ जानेवारीला सील उघडून चौकशीसाठी आवश्यक त्या फायली त्यांनी ताब्यात घेऊन त्याच दिवशी आयुक्तांना प्राथमिक अहवाल दिला होता. त्यानंतर २७ जानेवारीला पवार यांनी मुख्य लेखापरीक्षकांना पत्र लिहून रात्री माझा विभाग सील का केला? त्यानंतर लेखा विभागाचे अधिकारी हजर नसताना पंचनामा केला आणि ताब्यात घेतलेल्या संचिकांची माहिती मला दिली नाही, असे म्हटले होते. काही फायली गहाळ झाल्या असतील तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आता लेखापरीक्षण विभागाचीच असेल, असे त्यांनी म्हटले होते. 

दुसरीकडे चौकशी समितीचे काम सुरू होते. ज्या फायलींचे काम झाले, त्या फायली परत करण्यासाठी लेखा परीक्षण विभागाचा कर्मचारी बुधवारी लेखा विभागात गेला असता पवार यांनी त्या संचिका ताब्यात घेण्यास नकार दिला. नेमक्या किती फायली नेल्या होत्या, मला माहिती नाही आणि त्यामुळे आता किती परत आल्या, याची नोंद मी कशी घेऊ असे सांगून त्यांनी त्या परत केल्या. हे प्रकरण आता आयुक्तांच्या कोर्टात पोहचले असल्याचे समजते. 
बातम्या आणखी आहेत...