आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Selfie साठी फिल्मी चाळे; तलवारीने केक कटींग, चाकूसह फोटो काढण्याची तरुणांमध्ये स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- वाळूज औद्योगिक परिसराची ओळख मागील काही घटनांमुळे ‘गुन्हेगारांचे नगर’ म्हणून होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये धारदार शस्त्रांचा सर्रास झालेला वापर तसेच नव्याने ‘दादा’ म्हणून उदयाला येत असणाऱ्या तरुणांच्या वाढदिवसानिमित्त तलवारीने कट होणारे केक, फेसबुक- व्हॉट्सअॅपच्या प्रोफाइल फोटोमध्ये शस्त्रधारण करत फोटोसेशन करण्याची क्रेझ सध्या औद्योगिक परिसरातील तरुणांमध्ये वाढलेली दिसत आहे. तरुणांच्या हातातील म्यानाबाहेर निघणाऱ्या तलवारी पाहून येणाऱ्या काळात आणखी किती घटना घडणार? अशी चर्चा येथील उद्योजक, व्यापारी सुज्ञ नागरिकांतून होत आहे. 

वाळूज औद्योगिक नगरीत पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उल्लेखनीय बाब अशी की, सर्वच प्रकरणांतील आरोपींना स्थानिक पोलिसांनी काही तासांच्या आतच अटक करत आपली कार्यतत्परता दाखवून दिली. मात्र, एक नजर औद्योगिक परिसरातील नवमाध्यमांवर टाकली, तर निदर्शनास येत आहे की, दिवसेंदिवस तरुणांच्या हातामध्ये धारदार शस्त्रे येत आहेत. कायद्याचे अज्ञान अहंकार यामुळे हे तरुण नको ती कॉमेंट करत सदरील आक्षेपार्ह फोटो नवमाध्यमांवर सर्रास पोस्ट करून आपण किती सामर्थ्यशाली आहोत हे दाखवून स्वत:ची दहशत िनर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष 
परिसरातशस्त्रांचा वापर करत सार्वजनिक ठिकाणी दिवसाढवळ्या केक कापले जातात, मात्र पोलिस प्रशासनाला याबाबत माहिती कशी होत नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून उपस्थित होतो. कायद्याचे उल्लंघन करत शस्त्रे बाळगणाऱ्यांमध्ये बहुतांश तरुणांचे अनेक पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांशी असणारे ‘मधुर संबंध’ जनतेपासून लपून नाहीत. कदाचित त्यामुळेच या तरुणांची शस्त्रे बाळगण्याची हिंमत बळावत आहे की काय, अशी चर्चा परिसरात जोर धरताना दिसत आहे. 

पोलिसांना माहिती द्यावी 
माध्यमांचावापरकरत जर शस्त्रांसह फोटो अपलोड करत असतील तर त्या तरुणांची पोलिस प्रशासनाला नागरिकांनी माहिती द्यावी, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. यापूर्वी अशाच प्रकारे तलवारीने केक कापणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सर्वांची माहिती ठेवणे प्रशासनाला शक्य नाही, त्यामुळे नागरिकांनी पुढे यावे.
- गजानन कल्याणकर, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर सेल 

कायदेशीर कारवाई करणार 
विनापरवानगीइंचांपेक्षाअधिक लांबीच्या पात्याचे शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीवर ‘भारतीय हत्यार कायदा ४/२५’नुसार गुन्हा दाखल करता येतो. अशाच प्रकारचा गुन्हा मागील अडीच महिन्यांपूर्वी दाखल करण्यात आला आहे. यापुढे अधिक सतर्कता बाळगून संबंधित तरुणांची माहिती घेऊन कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- नाथा जाधव, पोलिस निरीक्षक, एमआयडीसी वाळूज 

शस्त्रे येतात कुठून 
दिवसेंदिवस तरुणांच्या तसेच अल्पवयीन तरुणांच्या हातामध्ये समाजासाठी घातक असणारी शस्त्रे कुठून येत आहेत? या शस्त्रांचा पुरवठा करणारी टोळी औद्योगिक परिसरात सक्रिय झाली आहे का? फेसबुक इतर नवमाध्यमांतून फोटो अपलोड करत शस्त्रांची जाहिरातबाजी करणे त्यानंतर शस्त्रविक्री करणे हा फंडा वापरला जातोय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नांची शस्त्रे बाळगणाऱ्या तरुणांच्या मानसिकतेची उकल त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यानंतरच समोर येणार आहे.
 
अनेक तरुणांकडून केक कापण्यासाठी सर्रास तलवारीचा वापर 
परिसरातील अनेक तरुणांकडून त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यासाठी प्लास्टिक सुरीएेवजी धारदार तलवारीचा वापर होत आहे. विशेष म्हणजे हा वाढदिवस बंद खोलीत साजरा करता परिसरातील गजबजलेल्या सार्वजनिक ठिकाणी केक कापून साजरा केला जातो. तलवारीने केक कापताच त्याचे फोटोसेशन करत फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या ग्रुपमधील मेंबरमध्ये आपली दहशत पसरवण्यासाठी त्यावर भडक कॉमेंट केल्या जातात. 
 
आजचे युग तलवारीचे नाही... 
परिस्थितीनुसार हाताततलवार घेणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या तरुणांनी आजच्या काळात तलवार नव्हे, तर संगणक घेऊन क्रांती करण्याची खरी गरज आहे. कारण आजचे युग हे तलवारीचे युग राहिले नाही.
- प्रदीप सोळुंके, शिवव्याख्याते 
 
पुढील स्लाइडवर पाहा फेसबुकवर अपलोड केलेले धारदार हत्यारांसोबतचे फोटोज्...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...