आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायलट प्रशिक्षणास धावपट्टी माेकळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- चिकलठाणा विमान प्राधिकरणाकडून खासगी कंपन्यांना पायलट प्रशिक्षणासाठी धावपट्टी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी रिलायन्स कंपनीच्या खासगी विमानाने उड्डाण घेऊन या सेवेचे उद्घाटन केले. संचालन कालावधी नसताना पायलट प्रशिक्षणासाठी येथून विमाने झेपावणार आहेत. यामुळे प्रवासी विमानांना यापासून कोणातही अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी विमानतळ प्रशासनाने घेतली आहे. या माध्यमातून उत्पन्नाची नवीन संधी आणि पायलट हबकडे वाटचाल सुरू झाली आहे.

देशातील विविध कॉर्पोरेट कंपन्यांकडे माल प्रवासी वाहतुकीसाठी विमाने आहेत. पण पायलटना प्रशिक्षण देण्याची फारशी सुविधा नसल्याने अडचणी येतात. दिल्ली मुंबई येथील विमानतळांवर प्रवासी विमानांची संख्या जास्त असल्याने येथे पायलटना प्रशिक्षण देणे शक्य होत नाही. पुणे आणि नाशिक येथील विमानतळ वायुसेनेच्या ताब्यात असल्याने तेथे खासगी कंपन्यांना प्रशिक्षण देण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे मुंबईपासून जवळ असणारे औरंगाबादचे चिकलठाणा विमानतळ पायलट प्रशिक्षणासाठी योग्य असल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्याला पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळाला असून १९ ऑक्टोबर रोजी रिलायन्स कंपनीच्या एका विमानाने उड्डाण घेत पायलटना प्रशिक्षण देणे सुरू केले. येत्या काही दिवसांत इतरही कंपन्यांच्या पायलटना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.

भविष्यातबनेल महत्त्वाचे केंद्र
खासगीकॉर्पोरेट कंपन्यांच्या पायलट प्रशिक्षणासाठी चिकलठाणा विमानतळाची धावपट्टी तसेच इतर यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला विविध कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सोमवारी रिलायन्स कंपनीच्या विमानाने उड्डाण भरून पायलट प्रशिक्षणास आरंभ केला आहे. यामुळे भविष्यात पायलट प्रशिक्षण महत्त्वाचे केंद्र बनेल. या उपक्रमामुळे विविध कंपन्यांचे लक्ष औरंगाबादकडे वळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आलोकवार्ष्णेय, निदेशक, चिकलठाणा विमानतळ