आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरखेड येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशी द्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- वाळूज लगतच्या पिंपरखेड, ता. गंगापूर येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या तरुणास फाशीची शिक्षा देण्याची मागणी तेली समाज शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली आहे. त्यासाठी हा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचे शिष्टमंडळाने म्हटले आहे. 
 
येथील १४ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी दूध आणण्यासाठी गेली होती. तेव्हा गावातील २२ वर्षीय अनिल विठ्ठल जाधव या तरुणाने तिला लगतच्या शेतीत उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता. ही घटना २२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेसातच्या सुमारास घडली होती. 
याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून वाळूज पोलिसांनी गुन्हा नोंदवून अनिल जाधव या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. पीडितेसह आरोपी अनिलची वैद्यकीय तपासणी केली होती. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबात प्रचंड अस्वस्थता आहे. 
 
पीडित मुलीला आई नसल्याने तिचा सांभाळ तिचे चुलते करतात. आमदार जयदत्त क्षीरसागर, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी सभापती नंदकुमार गांधीले यांच्यासह तेली समाज नेत्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या.
 
शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

तेलीसमाजाच्या शिष्टमंडळाने या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रकरणाची माहिती देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यात पीडित मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अनिल जाधव याला फाशीची शिक्षा द्यावी, त्यासाठी हा गुन्हा फास्ट ट्रॅक काेर्टात चालविण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
 
 
 तेव्हा आपल्या मागण्यांवर विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिले. त्याचबरोबर शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचीही भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. तेली समाज शिष्टमंडळात जे.यु.मिटकर, भारत कसबेकर, बापूराव वाळके, अशोक चौधरी, मनोज सतांसे, कचरू वेळंजकर यांचा समावेश होता.
बातम्या आणखी आहेत...