आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलावरून फेकून खुनाचा प्रयत्न, आरोपीच बोगस, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जमिनीच्या वादातून पुलावरून खाली फेकून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेल्या चार आरोपींचा थेट संबंध नसून त्यातील मुख्य आरोपी अद्यापही फरारच आहे. बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शेख सलीम यांनी खात्री करताच चौघांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला असल्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले. फिर्यादीनेच आरोपींबाबत खोटी माहिती दिल्याचेही स्पष्ट केले. 
 
फेब्रुवारी रोजी मध्यरात्री जमिनीच्या वादातून सोहेल बावजीर याला एका टोळक्याने मारहाण केली होती. घाटीत उपचार घेऊन सोहेल मित्र शेख कलीम याच्यासोबत घरी जात होता; परंतु टाऊन हॉल उड्डाणपुलावर याच टोळीतील काहींनी सोहेलसह कलीमला मारहाण केली होती. त्यानंतर कलीम शेखला उड्डाणपुलावरून खाली फेकले होते. या प्रकरणात बेगमपुरा पोलिसांनी अहेमद शेख इमाम शेख ऊर्फ पटेल, मुजीब हबीब शेख ऊर्फ पटेल, शेख नाजेर शेख शहानूर ऊर्फ पहिलवान, अब्दुल अहेमद वली महमंद ऊर्फ मोतीवाला ऊर्फ कादर अशा चौघांना पकडले होते. मोतीवाला ऊर्फ कादर वगळता यातील अन्य तिघांचा या प्रकरणाशी थेट संबंध नसतानाही त्यांना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक शेख सलीम यांनी केली. त्यामुळे त्यांची सोमवारी तडकाफडकी मुकुंदवाडी ठाण्यात बदली करण्यात आली. शेख मुन्शीसह त्याच्या अन्य दोन साथीदारांचादेखील याप्रकरणाशी संबंध असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, त्याचे दोन साथीदार धार्मिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेलेले आहेत. 
 
आरोपी पैठणला होता 
पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी अहेमद पटेल शहरात घटना घडली तेव्हा चार मित्रांसोबत पैठण येथील एका ढाब्यावर जेवण करत होता. काही वेळेअगोदर ढोरकीनजवळील परिसरातील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचे समोर आले. तर शेख नाजेर एका कार्यकर्त्याच्या कार्यालयात होता. 
बातम्या आणखी आहेत...