आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमाफियांवर थेट मोक्का लावून तडीपार करणार, पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आता भूमाफियांवर थेट मोक्काची कारवाई केली जाईल, असा सज्जड दम पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांनी भूखंडाचे घोटाळे करणाऱ्यांना दिला. शहरातील प्रामाणिक लोकांचे भूखंड आणि मालमत्ता बळकावणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करून तीन महिन्यांत त्यांची दादागिरी मोडीत काढली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील गुन्ह्यांमध्ये जमीन खरेदी- विक्रीत फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले. त्यांनी शुक्रवारी गुन्हे शाखेची बैठक घेतली आणि भूमाफियांची यादीच मागवली. 

कागदपत्रांमध्ये फेरफार करून दुसऱ्याची जमीन बळकावणे या प्रकाराला लगाम लावण्यासाठी येत्या तीन महिन्यांमध्ये रेकॉर्डवरील भूखंड माफियांची माहिती गोळा करण्याचे आदेश यादव यांनी गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखेसह सर्व पोलिस ठाण्यांच्या निरीक्षकांना दिले आहेत. सराईत भूमाफियांविरुद्ध आता मोक्का, एमपीडीए (महाराष्ट्र झोपडपट्टी, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणारे कलम) आणि हद्दपारीचे गंभीर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. 
बातम्या आणखी आहेत...