आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद - मुलीवर अत्याचारप्रकरणी19 पर्यंत पोलिस कोठडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पुंडलिकनगर परिसरातील १७ वर्षांच्या मुलीस फूस लावून पळवून नेणारा आरोपी आकाश रमेश पांगटे (१९, रा पाथर्डी फाटा, सराफा मळा, नाशिक) यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता १९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. 
 
मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादीची मुलगी तिच्या मोठ्या बहिणीसोबत मार्च २०१७ रोजी मंदिरात दर्शनासाठी गेली असता अचानक दिसेनाशी झाली. शोध घेतला असता ती एका मुलासोबत रेल्वेस्थानक येथे दिसल्याचे कळले. तिथे तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. मार्च २०१७ रोजी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...