आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनींना पोलिसांतर्फे कामकाज, शस्त्रास्त्रे हाताळण्याचे धडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड- पोलिस स्थापना दिनानिमित्त सिल्लोड शहर पोलिस ठाण्यामध्ये विद्यार्थिनींना शस्त्रांची व पोलिस कामकाजाची माहिती देण्यात आली.
  
शहर पोलिस ठाण्याच्या आवारात मंगळवार, दि. ३ रोजी सकाळपासूनच लगीनघाई सुरू होती. मंडप टाकून टेबलावर बंदुका, पिस्टल ठेवण्यात आले होते. काय घडले, घडणार, याकडे सर्व जण कुतूहलाने पाहत होते. पोलिस स्थापना दिनाचे औचित्य साधून सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कांतीलाल पाटील यांनी विद्यार्थिनींना पोलिसांच्या कामकाजाची माहिती दिली.
 
उपविभागीय पोलिस अधिकारी बाजीराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलिसांनी त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे हाताळण्यास दिली. विद्यार्थी यांनी कुतूहलाने शस्त्रांची माहिती घेतली. कमरेला लावलेले पिस्टल चोर चोरतात का, असे प्रश्नही या वेळी विद्यार्थिनींकडून विचारले गेले.  लॉकअपमधील गुन्हेगारांना पाहून भीतीच्या रेषा त्यांच्या चेहऱ्यावर उमटल्या. 

विद्यार्थिनींना  दिसू नये याचा प्रयत्न गुन्हेगारांनी केला. विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी सावधानता बाळगा, इसिसचा धोका ओळखा, अार्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी अावाहन, महिला- मुलींनी घ्यावयाची काळजी, महिलांचे अधिकार, एकीचे बळ अशी विविध माहिती असलेली भित्तिपत्रके लावण्यात आली होती. गुन्हेगारीच्या घटनांपासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांना सर्व पाहून  अप्रूप वाटले. दरम्यान विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे निरसन पोलिसांनी केले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...