आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था : ना पाणी आहे, ना जेवण, ना निवासाची व्यवस्था; तरीही युवकांची जिद्द देशसेवेची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - भरतीची वेळ चुकू नये, भरतीप्रसंगी थकवा राहू नये या अनुषंगाने आराम होईल या नियोजनानुसार एक दिवस अगोदरच उमेदवार सैन्यभरतीच्या ठिकाणी दाखल होत आहेत, परंतु प्रशासनाने भरती उमेदवारांसाठी परिसरात थांबण्यासाठी,पाण्याची कुठलीच व्यवस्था केल्यामुळे प्रशिक्षणार्थींची गैरसोय होत आहे. या परिस्थितीतही उमेदवारांनी रस्त्याच्या बाजूला, कुणी मोतीबागेत तर कुणी बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगमध्येच जेवण आराम करून प्रवासाचा थकवा घालवला. यामुळे ‘ना पाणी, ना जेवण ना निवासाची व्यवस्था तरीही जिद्द देशसेवेची’ असे चित्र धुळे जिल्ह्यातून दाखल भावी सैनिकांतून दिसून आले. 
 
२७ एप्रिल ते मे या अकरा दिवसीय कालावधीत धुळे, हिंगोली, जालना, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, नांदेड, नंदुरबार, परभणी या नऊ जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी सैन्यभरती होत आहे. सोल्जर जनरल ड्यूटी, सोल्जर टेक्निकल, सोल्जर क्लर्क/स्टोअर किपर टेक्निकल, सोल्जर ट्रेडसमन, सोल्जर नर्सिंग असिस्टंट या पदासाठी नऊ जिल्ह्यांतून तब्बल ५० हजार प्रशिक्षणार्थींनी ऑनलाइन नोंदणी केल्याचे सैन्यभरती कार्यालयात सांगण्यात आले. यानुषंगाने जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या मैदानात भरती होत आहे, परंतु या भरतीवर सैनिक कल्याण विभागाचे नियंत्रण असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना थांबण्यासाठी भरती केंद्राबाहेर थांबण्याची, पाण्याची व्यवस्था करण्याची गरज असतानाही कुठेच सोय केली नसल्यामुळे उमेदवारांची पाणी निवाऱ्यासाठी धावपळ होत आहे. दरम्यान, बुधवारच्या रात्री शारीरिक पात्रता, शारीरिक क्षमता याची पात्रता होणार असल्यामुळे उमेदवारांना चांगल्या निवासाची गरज आहे. तसेच उमेदवार रात्री, दिवसा आल्यानंतर भरतीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येत नव्हता. यामुळे या उमेदवारांनी कुठे थांबावे, असा प्रश्न होता. 
 
उमेदवारांसाठी व्यवस्था करणार 
- उमेदवारांची गैरसोय होणार नाही, यादृष्टीने व्यवस्था करीत आहे. क्रीडा संकुलाच्या बाहेरील गैरसोय होणार नाही, वेगळे नियोजन लावून व्यवस्था करण्याच्या सूचना करतो. शिवाजीरावजोंधळे, जिल्हाधिकारी, जालना. 

पाणीही नाही, निवाराही नाही 
- देशसेवेच्या हेतूने भरतीसाठी या ठिकाणी परिश्रम घेत पोहोचलो, परंतु या ठिकाणी ना पाणी, ना निवारा कोणत्याच सुविधा नसल्यामुळे रात्रीच्या प्रवासाचा थकवा कसा घालवणार. शुभम देशमुख, उमेदवार, सैन्यभरती धुळे. 

मध्यरात्रीच भरती प्रक्रिया 
दिवसा ऊन असल्यामुळे मैदानी चाचणी घेताना उमेदवार आजारी पडू नये अथवा धावा करताना काही दुर्दैवी घटना घडू नये, म्हणून ही भरती प्रक्रिया दररोज रात्रीच घेतली जाणार आहे. 
 
रिक्षाचालकांकडून लूट 
- उमेदवारांकडूनरात्रीच्या वेळी पाचशे-पाचशे रुपयांची लूट केली आहे. रिक्षाचालकांनी शिवाजी पुतळा, एसआरपीफकडे नेऊन जास्तीचे पैसे उकळले.
राजेंद्रधूलकर, भरती उमेदवार पालक, धुळे. 
 
उमेदवारांनी येथे घेतला ‘विसावा’ 
भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना थांबणे पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यामुळे भरतीच्या ठिकाणच्या जवळ असलेल्या धूळ खात पडलेली इमारत, नवीन इमारतीचे बांधकाम, मोतीबागेचा परिसर, रोडच्या कडेचा परिसर या ठिकाणी समूहाने विसावा घेतला. क्रीडा कार्यालयाच्या परिसरातील इमारतीत कमालीची अस्वच्छता होती. परंतु दिवसभर आराम करायचा यामुळे या उमेदवारांनीच हा परिसर स्वच्छ करून या ठिकाणांवर ‘विसावा’ घेतला. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, एक कि.मी.वर पाणी आणि ...आता पुढे काय?
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...