आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा विजयी ग्रामपंचायत सदस्य मोकासेंच्या नेतृत्वात सेनेत? तालुक्यात ठरला चर्चेचा विषय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिशोर- कन्नड तालुक्यात आमदार हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे विरोधक असलेले माजी सभापती नारायण मोकासे यांचा शिवसेनेत प्रवेश घडवून आणल्याने चर्चेचा विषय ठरला.
पंचायत समितीचे माजी सभापती नारायण मोकासे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत १७ पैकी दहा जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. यानंतर त्यांनी आमदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पिशोरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांना पत्र देऊन आमदार जाधव यांच्या औरंगाबादेतील निवासस्थानी शनिवारी सर्व विजयी दहा उमेदवारांसह शिवसेनेत प्रवेश केला. नारायण मोकासे यांच्यासोबत सूर्यकांत मोकासे, रमेश दवंगे, धीरज शेजवळ, बापू हरणकाळ, किसन मोकासे, नारायण माढेकर, बाळासाहेब जाधव, हरिभाऊ मोकासे, युनूस टेलर, बाजीराव सुरडकर व गणेश सुरडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
विकासासाठी गरज
गावाचा विकास करण्यासाठी हे करणे गरजेचे होते. प्रवेश केल्याने आमदार जाधव यांनी गावाच्या विकासासाठी लवकरात लवकर निधी देण्याचे मान्य केले आहे.
नारायण मोकासे
शिवसेनेत स्वागत
गावाचा विकास व शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी माजी सभापती नारायण मोकासे यांचे शिवसेनेत स्वागत आहे. त्यांच्याकडून विकासकामात वाटा राहील.
हर्षवर्धन जाधव, अामदार