आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक वृत्तांतून प्रेरणा, शालेय बचत बँकेचा उपक्रम, २६ जानेवारीला उद‌्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपळदरी - ‘दिव्य मराठी’च्या सकारात्मक बातम्यांतून प्रेरणा घेत सिल्लोड तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थी बचत बँक स्थापण्यासाठी नुकताच एका बैठकीत ठराव घेतला. दि. २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनापासून बँकेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. विद्यार्थिदशेत बचतीचे महत्त्व व बँकेचे तसेच आर्थिक व्यवहार हाताळण्याचे ज्ञान व्हावे यासाठी हा उपक्रम कौतुकास्पद असून यातून शाळेसह विद्यार्थ्यांची प्रगती साधण्यासाठी निश्चितच मदत होईल, असा सूर बैठकीत होता.

खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या कल्पनेला शिक्षकांनी शाळेत बचत बँक स्थापण्याचा ठराव घेऊन पूर्ण रूप दिले. त्यानुसार शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बचत बँकेत २०० विद्यार्थी सदस्य होणार असून त्यातून १५ जणांचे संचालक मंडळ बँकेचे कामकाज पाहणार आहे. त्यातून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांची निवड करण्यात आली. यात अध्यक्षपदी वर्ग आठवामधील मयूरी प्रकाश बिरारे हिची निवड झाली, तर सचिवपदी संतोष अशोक चव्हाण याची निवड करण्यात आली. या बचत बँकेत सदस्य होण्यासाठी प्रत्येकी १० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.