आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोस्टाच्या योजनांसाठी आता घरपोच सेवा 170 पोस्टमनना देणार हँडहेल्ड डिव्हाइस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी केंद्राने अनेक पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पोस्ट खात्याचे कामकाजही कॅशलेस करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद डाक क्षेत्रात पायलट प्रोजेक्ट राबवला जात असून १० दिवसांत १७० पोस्टमनला हँडहेल्ड डिव्हाइस सोपवले जाणार आहेत. त्याद्वारे पोस्टाची सर्व कामे, वीज बिल, विमा हप्ता, विविध योजना, स्पीड पोस्ट असे व्यवहार करता येईल, अशी माहिती जनरल पोस्टमास्तर प्रणव कुमार यांनी दिली. 

रोज ९० हजार टपाल 
डाकविभागात ४८९ डाकघरे आहेत. त्यापैकी ७५ शहरी ४१४ ग्रामीण भागात आहेत. विभागातील १० लाख ८० हजारांवर नागरिक पोस्टाच्या अल्प बचत योजनेचा लाभ घेत असून दररोज ९० हजार टपाल जमा होऊन वितरित केले जाते. पोस्टात ११ लाखांपेक्षा जास्त खातीही आहेत. 

या सर्व ग्राहकांना दर्जेदार सेवा सुविधा देण्यासाठी सर्व डाक विभाग माहिती तंत्रज्ञानाशी जोडण्याचे प्रयत्न वेगाने होत आहेत. टपाल कार्यालयातील कर्मचारी, पोस्टमनला हँडहेल्ड डिव्हाइस दिले जाणार असून हे डिव्हाइस छावणी मुख्य कार्यालयात उपलब्ध झाले आहेत. 
 
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण 
पहिल्याटप्प्यात जेथे स्पीड पोस्ट, आदी कामे जास्त आहेत, अशा ठिकाणाच्या १७० पोस्टमनला हँडहेल्ड डिव्हाइस सोपवले जाणार आहेत. मशीनची हाताळणी व्यवहार कसे करायवे, याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

असा होईल फायदा 
टपालवितरित करणारे पोस्टमन या मशीनच्या साहाय्याने स्पीड पोस्ट, विमा हप्ता आदी सेवा ग्राहकांना देणार अाहेत. बँकिंगसह सर्व व्यवहारांच्या नोंदी ऑनलाइन होणार असल्याने या नोंदी काही सेकंदांत केंद्रीय कार्यालयात पाठवणे शक्य होणार आहे. यातून पोस्टाच्या कामकाजात पारदर्शकता येईल. मेल सेवा, पेमेंट, टेलिफोन, वीज बिल, आदी देयके व्यवहारासाठी ऑनलाइन सेवा फायदेशीर ठरेल, असा विश्वास प्रणव कुमार यांनी व्यक्त केला. 
बातम्या आणखी आहेत...