आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज तार अंगावर पडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 गेवराई - गावातील खांबावरील जीर्ण झालेली वीज तार तुटून अंगावर पडल्याने ४५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गेवराई तालुक्यातील रोहितळ येथे सोमवारी सकाळी दहाच्या वाजेच्या सुमारास घडली. 
 
रोहितळ येथील सर्जेराव आश्रुबा शिंदे (४५) हे सोमवारी सकाळी जेवण करुन शेतात जात होते. यावेळी घरासमोरील विद्युत खांबावरील जीर्ण वीज तार तुटून त्यांच्या अंगावर पडली. विद्युत प्रवाह सुरु असल्याने शिंदे यांना विजेचा जबर धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या मयत शेतकऱ्यास केवळ एक एकर जमीन असून परिस्थिती हलाखीची होती. शिवाय या शेतकऱ्याकडे डीसीसीचे कर्जही होते. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वयोवृध्द आई-वडील, पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...