आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज केला अन् थेट खात्यात दोन लाख रुपये झाले जमा! प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचा लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आतापर्यंत कोणत्याच सरकारी योजनेचा लाभ मिळालेला नाही. प्रधानमंत्री जीवन विमा योजनेचाही लाभ मिळेल, असे वाटले नव्हते. परंतु पतीने गेल्या वर्षीच या योजनेअंतर्गत पॉलिसी काढली होती. पतीच्या निधनानंतर कागदपत्रे जमा केली अन् लगेच थेट बँक खात्यात विम्याची दोन लाख रुपयांची रक्कम जमा झाली. हा अनपेक्षित धक्का होता, असे मत प्रधानमंत्री जीवन विमा योजनेच्या लाभार्थी रुक्मिणीबाई आसाराम कोल्हे यांनी व्यक्त केले. दलालाशिवाय दोन लाखांची रक्कम खात्यात जमा झाली, हे या योजनेचे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जीवन विमा योजनेअंतर्गत वर्षाला ३३० रुपयांचा हप्ता भरून पॉलिसी काढता येते. यात पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास वारसदाराला लाख रुपये मिळतात. या योजनेवर टीका झाली. मात्र, योजनेचा फायदा मिळालेल्या एका महिलेने या योजनेचे तोंडभरून कौतुक केले. राजेराय टाकळी (ता. खुलताबाद) चे शेतकरी आसाराम विश्वनाथ कोल्हे (५५) यांनी गतवर्षी मार्चमध्ये प्रधानमंत्री जीवन विमा योजनेअंतर्गत पॉलिसी काढली. पॉलिसीवर वारसदार म्हणून पत्नी रुक्मिणीबाई आसाराम कोल्हे यांचे नाव टाकले.

दुर्दैवाने २७ डिसेंबर २०१५ रोजी कोल्हे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. याचा कुटुंबीयांना धक्का बसला. या धक्क्यातून सावरत रुक्मिणीबाईंनी बँकेत पासबुकमधून पॉलिसीचा हप्ता कापल्याची नोंद आणि मृत्यू प्रमाणपत्र जमा केले. त्यांनी रुक्मिणीबाईंना एलअायसीच्या औरंगाबाद कार्यालयात पाठवले. येथे कागदपत्रे तपासून सिडिंगची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. गेल्या आठवड्यात त्यांच्या खात्यात थेट लाख रुपये जमा झाले. अचानक जमा झालेल्या पैशांचा रुक्मिणीबाई आणि कुटुंबीयांनाही धक्का बसला. या पैशातून त्यांनी घराचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिष्ठितांचे सहकार्य
रुक्मिणीबाई यांना चार मुली असून सर्व विवाहित आहेत. दोन मुलांनी बारावीची परीक्षा दिली असून त्यांना अनुक्रमे ६५ आणि ७० टक्के मार्क्स मिळाले आहेत. पुढील शिक्षणासाठी ते औरंगाबादेत येणार आहेत. विम्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना गावातील प्रतिष्ठित नागरिक रतन मालोदे आणि राहुल देशमुख यांनी सहकार्य केले.

पहिलेच प्रकरण
गोरगरिबांच्या हितासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र, त्या सामान्य जनतेपर्यंत पोहोचतातच असे नाही. त्यामुळे यातील बहुतांश योजनांबाबत सर्वसामान्यांमध्ये उदासीनता दिसून येते. परंतु या योजना खरोखरच उपयोगी आहेत, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे. या योजनेअंतर्गत विनाविलंब लाभ मिळाल्याचे मराठवाड्यातील हे पहिलेच उदाहरण आहे. - राहुल देशमुख,

गरजेच्या वेळी फायदा
सरकारीमदतएवढ्या लवकर आणि कोणत्याही एजंटाविना मिळू शकते, हे पहिल्यांदाच अनुभवायला मिळाले. आम्ही इतरांच्या सांगण्यावरून सहजच पॉलिसी काढली होती. मात्र, त्याचा खऱ्या अर्थाने गरजेच्या वेळी फायदा झाला. -रुक्मिणीबाई आसाराम कोल्हे, लाभार्थी
बातम्या आणखी आहेत...