आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जे शेतकरी हिताचे तेच आम्ही सातत्याने मांडणार : आ. प्रशांत बंब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासूर स्टेशन- भाजप सरकारने शेतकरी हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले असून यापुढेही घेत राहणार आहे. लोकप्रतिनिधींनी केवळ विरोधकांच्या बेजबाबदार निधोरणात्मक बोलण्याकडे लक्ष देता शेतकरी हिताचे कार्य केले पाहिजे. शेतकरी हिताचे आहे तेच आम्ही सातत्याने मांडणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत बंब यांनी केले. भाजपच्या वतीने २५ ते २८ मे या कालावधीत शिवार संवाद सभेचे आयोजन केले आहे. या अनुषंगाने लासूर स्टेशन परिसरात शिल्लेगाव जिल्हा परिषद गणांतील विविध गावांत २५ मे रोजी ठिकठिकाणी शिवार संवाद सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी माजी बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव, कृउबा समिती संचालक महेंद्र पांडे, सुरेश जाधव, शेषराव जाधव, गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे संचालक नानासाहेब गायके, प्रदीप भुजबळ, भागाठाण ग्रामपंचायत सरपंच युवराज ताठे, व्यापारी सुरेश मुनोत, भीमराव पांडव, प्रतीक चंडालिया, नंदकिशोर बनसोड, संतोष दांडगे, कलीम भारतवाला, प्रमोद बडोगे, कारभारी गायके उपस्थित होते. आमदार बंब पुढे म्हणाले, अभियानाच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंतच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. 

भाजप सरकार बळीराजाच्या कर्जमुक्तीसाठी शाश्वत शेती समृद्ध शेतकरी घडवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करून त्यावर दीर्घकालीन आणि चिरंतर चालणाऱ्या ठोस उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेत आहे. जलयुक्त शिवार, विहीर, सूक्ष्म सिंचन, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त तलाव, वीज, बी-बियाणे, आरोग्य, अन्न सुरक्षा, पीक कर्ज पुनर्गठन, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, गटशेती, तंत्रज्ञान, फलोत्पादन, प्रभावी बाजारपेठ व्यवस्था, शेतमालाला भाव, शेतकरी जोडधंद्यासाठी प्रोत्साहन, कृषी प्रक्रिया उद्योगांची निर्मिती, तुरीसंदर्भातील उपाययोजना अशा विविध योजनांची माहितीही त्यांनी दिली. दोन दिवसांत आमदार बंब यांनी गंगापूर, खुलताबाद, वैजापूर, फुलंब्री तालुक्यात शिवार संवाद सभा घेतल्या. या वेळी गणेश व्यवहारे, नारायण वाकळे, सोपान बोरकर, दिलीप पवार, अशोक सौदागर, प्रकाश कोकरे, भीमराव पांडव, प्रतीक चंडालिया, बाळू चव्हाण, काकासाहेब डुबे, रामदास शेलार, शंकर औताडे, शांताराम औताडे, बाबासाहेब औताडे, संतोष अहिरे, सुनील जमदाडे, प्रभाकर बडोगे, सुरेश कुकलारे, शिवनाथ गायकवाड, मनसुख डुबे, मोहन डुबे, राजू रावते, नंदकिशोर बनसोड, संतोष दांडगे, कलीम भारतवाला, प्रमोद बडोगे, कारभारी गायके, अजय क्षीरसागर, नजीर पठाण, राजू पठाण, अभय राजपूत, राजू गायकवाड, अशोक शिंदे आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...