आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: पाण्याऐवजी मिळाली खड्ड्यांची ‘बक्षिसी’, गुरुसहानीनगरवासीय त्रस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन महिन्यांपासून पाणीच येत नव्हते. नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला, पण फायदा झाला नाही. अखेर मनपा आयुक्तांकडे तक्रार केली. आयुक्तांनी यंत्रणा हलवली. अधिकारी कामाला लागले; पण प्रश्न सोडवण्यासाठी नव्हे तर उलट टेस्टिंगच्या नावाखाली जागोजागी खड्डे खोदून कर्मचारी पसार झाले. याला दीड महिना उलटला. पाणी तर आले नाहीच वर आहे त्या चांगल्या रस्त्याची वाट लागली. सिडको एन-४ मधील गुरुसहानीनगरात हा प्रकार घडला आहे. 
 
गुरुसहानीनगर येथील रहिवाशांना वसाहतीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलवाहिनीतील बिघाड दुरुस्त करण्यासाठी सुरुवातीला मनपाच्या पाणीपुरवठा विभागाने असंख्य चकरा मारायला लावल्या. या विभागाच्या शाखा अभियंत्यापासून उपअभियंता आणि कार्यकारी अभियंत्यापर्यंत साऱ्यांशी संपर्क साधला. पण कुणीही बधले नाहीत. हंडाभर पाणीही मिळणे मुश्कील झाल्यामुळे अखेर त्यांनी २८ नोव्हेंबर २०१६ रोजी आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याकडे कैफियत मांडली. आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली आणि तातडीने यंत्रणा कामाला लावली. 
 
यानंतर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचेे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल, उप अभियंता आय. बी. खाजा आणि कनिष्ठ अभियंता माणिक गोरे यांनी प्रत्यक्ष या गुरुसहानीनगरातील वसाहतीत येऊन येथील संपूर्ण जलवाहिनीची पाहणी केली. काही अंशी प्रयत्न करून पाइपलाइन तपासणीसाठी काही ठिकाणी खोदकाम करून तपासले; पण त्यांना फॉल्ट सापडला नाही. मग त्यांनी तपासणीच्या नावाखाली रस्त्यारस्त्यांवर जागोजागी खड्डे खोदून ठेवले, तरीही फॉल्ट काही सापडला नाही. अखेर खड्डे तसेच ठेवून कर्मचारी निघून गेले. त्याला आता दीड महिना होत आला. पाणी तर मिळालेच नाही, उलट खड्ड्यांची ‘बक्षिसी’ मात्र मिळाली. 
 
काय म्हणतात अधिकारी 
या गुरुसहानी नगरात नेमका काय फॉल्ट आहे तो सापडतच नाही. तेथे १०० बाय ७५ एमएमचे पाइप टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी अंदाजपत्रकही तयार केले आहे; पण तीन वर्षांपासून ठेकेदारांची थकबाकी आहे. त्यामुळे ठेकेदार काम करायला तयार नाहीत. दुसरीकडे कुठलीही कंपनी उधारीवर पाइप द्यायला तयार नाही. अशा सगळ्या अडचणी असल्या तरीही आठवडाभरात हे काम मार्गी लावू. आय.बी.खाजा,उपअभियंता,मनपा 
 
काय म्हणतात नागरिक 
पाण्याला फोर्सचनाही. त्यात १० मिनिटेही पाणी येत नाही. जलवाहिनी तपासण्यासाठी सहा दिवस खोदकाम केले. जलवाहिनी काढून तिला खाली घेतले, पण उपयोग झाला नाही. आमच्या उशाशी हनुमाननगरचा जलकुंभ असताना आमच्या घशाला कोरड आहे. याच जलकुंभावरून न्यायनगरला गेलेली जलवाहिनी ५० फुटांवर आहे तिथून आम्हाला पाणी देण्यात यावे.
 
प्रवीणभुजबळ, पी.डी.देशपांडे,वर्षा सोनुने, हरेंद्र सोत्रे, शुभांगी कदम 
तीन महिन्यांपासून आहे प्रचंड टंचाई, टेस्टिंगच्या नावाखाली महापालिकेने दीड महिन्यांपासून जागोजागी खोदून ठेवले, फॉल्ट काही सापडलाच नाही... 
समस्या 
 
बातम्या आणखी आहेत...