आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लागवड क्षेत्र वाढल्याने अद्रक, मागणी घटल्याने मोसंबीत घसरण; पांढऱ्या सोन्याची चकाकी कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हतनूर- कन्नड तालुका म्हणजे अद्रक पिकाचे माहेर घर, हतनूर, शिवराई, बनशेंद्रा, भोकनगाव, चिकलठाण, बहिरगाव, तालुक्यात अद्रक उत्पादनात अग्रेसर परंतु दोन वर्षांपासून सुरू असलेली अद्रकाच्या भावाची नीचांकी सुरूच असल्याने येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

१० ते १० वर्षांपासून येथील शेतकरी अद्रकाचे विक्रमी उत्पादन घेत आहेत. एकरी लाखोंचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांमुळे कन्नड तालुका राज्यात ओळखला जाऊ लागला. एकरी दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळू लागल्याने अनेक शेतकरी अद्रक पिकाकडे वळले होते, परंतु दोन ते तीन वर्षांपासून अद्रक पिकाची भावात होणारी घसरण सुरूच राहिली आहे. सरासरी तीन हजार प्रतिक्विंटलने विकणारे अद्रक आज घडीला सातशे ते हजार रुपये प्रतिक्विंटलने विकावे लागत असल्याने केलेला खर्च निघणे दूरचे झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहे.  
बातम्या आणखी आहेत...