आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी हिताच्या नावाने प्राचार्यांचे सशुल्क पार्किंगला समर्थन, नफा व्हावा हा उद्देश नाही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विद्यार्थ्यांच्या पार्किंगसाठी पुरेशी जागा आणि सुविधा ही महाविद्यालय मान्यतेच्या अनिवार्य अटींपैकी एक असतानाही महाविद्यालयांच्या परिसरात पार्किंगचा खुलेआम व्यवसाय सुरू आहे. शिक्षण शुल्क भरून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा विनाशुल्क असणे अपेक्षित आहे. महाविद्यालयांच्या प्राचार्यांनाही मनातून ही शुल्क वसुली गैर वाटते. मात्र, ते उघडपणे बोलायला धजावत नाहीत. संस्थाचालकांच्या भीतीपोटी ते व्यवसाय अथवा धंदा म्हणून नव्हे, तर वाहनांच्या सुरक्षेसाठीच आम्ही पार्किंग शुल्क आकारतो, असे सांगत विद्यार्थ्यांच्या या आर्थिक लुटीचे समर्थन करत आहेत. हा संस्थेचा निर्णय असल्याचे सांगून ते अंगही काढून घेत आहेत.
 
व्यवस्थापनाचा निर्णय 
^पार्किंगसाठी निविदाकाढून ती चालवण्यास देण्यात आली आहे. हा व्यवस्थापनाचा निर्णय आहे. अर्थात वाहनांची सुरक्षाही आवश्यक आहे. एखाद्या वाहनाचे नुकसान झाल्यास ते भरून दिले जाते. त्याची जबाबदारी पार्किंगवाल्याची आहे. -डॉ. उल्हास शिऊरकर, प्राचार्य, देवगिरी 
 
नफा व्हावा हा उद्देश नाही.... शिस्त लावणे महत्त्वाचे 
^ पार्किंगसाठी स्वतंत्र यंत्रणा ठेवणे हा संस्थेचा निर्णय आहे. -जगदीश खैरनार, प्राचार्य, स.भु. कला, वाणिज्य महाविद्यालय 

^ पार्किंगसाठी घेणे पैसे योग्य की अयोग्य, यापेक्षा शिस्त लावणे महत्त्वाचे आहे. पार्किंग नि:शुल्क असताना कुठेही वाहने लावली जात होती. त्यामुळे संस्थेने निविदा मागवून पार्किंग चालवण्यास दिले . -डी. आर. शेंगुळे, प्रभारी प्राचार्य, विवेकानंद महाविद्यालय 

^बऱ्याच वेळाकाही जण येऊन गाडी पार्क करून जातात. लवकर येतच नाहीत. बऱ्याच वेळा गाडीचे नुकसान होते. कुणी काच काढून नेत होते. हवा सोडून देत होते. त्यामुळे संस्थेने सुरक्षा आणि त्रास नको म्हणून निविदा काढून पार्किंगचे कंत्राट दिले आहे. -डॉ. सुभाष चव्हाण, उपप्राचार्य, वसंतराव नाईक महाविद्यालय 

^पार्किंगमधून ग्लासचकाढून नेला, पेट्रोलच काढून घेतले, अशा तक्रारी येतात. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचाही त्रास होतो. त्यामुळे पेड पार्किंगची सुविधा सुरू आहे. त्यात नफा व्हावा, हा उद्देश नाही. -पी. व्ही. आष्टेकर, प्राचार्य, शिवछत्रपती महाविद्यालय 
 
हे ही वाचा, 
बातम्या आणखी आहेत...