आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणांनी रडत राहण्यापेक्षा लढत राहावे : विश्वास नांगरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तरुणांनी आपल्या समोरची आव्हाने कोणती आहेत ते पहिल्यांदा समजून घेऊन ती सामर्थ्यांने पेलवणे अतिमहत्त्वाचे आहे. त्याचबरोबर शिक्षणाने चारित्र्य आणि नैतिकता प्राप्त झाली तरच शिक्षित तरुण जीवनात यशस्वी होतात. त्यासाठी तरुणांनी रडत बसण्यापेक्षा आलेल्या परिस्थितीशी लढत राहून त्यावर विजय मिळवावा, असे प्रतिपादन विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले. फुलंब्री येथील श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभांच्या कार्यक्रमात शुक्रवारी (७ ऑगस्ट)ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे हे हाेते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील हे होते. तर संस्थेचे सचिव सर्जेराव ठोंबरे, सहसचिव शामराव नाईक, प्राचार्य डॉ. एस. आर. टकले तर प्रा. डॉ. पांडुरंग कल्याणकर, डॉ. जयश्री पवार, प्रा.डॉ. मंजूषा नळगीरकर, प्रा. विजय पांडे, डॉ. रामकिशन लोमटे, प्रा. दत्तात्रय येडले, डॉ. संजीवकुमार पांचाळ, डॉ. गणेश कुलकर्णी, प्रा. डॉ. संदीप जगताप, प्रा.राजेंद्र आंबवणे, दयाराम कांबळे, प्रेम चव्हाण, बाबासाहेब दाभाडे, रत्नाकर जाधव, जयराम जाधव आदी उपस्थित होते. या वेळी राजश्री चव्हाण या विद्यार्थिंनीस "कै. धुपाजी खोतकर पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. तसेच "दुष्काळाचे सावट' या वार्षिक अंकाचेही प्रकाशन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. एस. आर. टकले तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. अश्विन रांजणीकर व महेश थोरात यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...