आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजगराचे पाच महिन्यांचे पिल्लू सापडले, सर्पमित्राने केले उपचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेंद्रा एसमआयजीसी शनिवारी सकाळी 8 वाजता अंदाजे पाच महिन्यांचा अजगर रस्त्यावर जखमी अवस्थेत सृष्टीसंवर्धन संस्थेचे सर्पमित्र मनोज गायकवाड व डॉ. किशोर पाठक यांना दिसला. त्यांनी तात्काळ संस्थेत आणून त्याच्यावर उपचार सुरू केले. त्याच्यावर सध्या औषधोपचार चालू आहेत.
 
सर्पसित्र गायकवाड वर डॉ. पाठक यांनी सकाळी 7.30 वाजता एमआयडीसी शेंद्रा येथील कर्मचारी गणेश यांनी फोन करून जखमी अजगर रस्त्यावर पडून असल्याची माहिती दिली. डॉ. पाठक व गायकवाड यांनी तात्काळ घटना स्थळी जाऊन अजगराला ताब्यात घेतले. हे छोटेसे अजगराचे पिल्लु असुन तो झाडावरुन पाडल्याने त्याच्या पोटाकडील बाजू व बरगडूला मार लागला आहे. हे अजगराचे पिल्लु अंदाजे पाच ते सहा महिन्याचे असावे. त्याच्यावर उपचार करून त्याची प्रकृती बरी होताच त्याला सोडून देण्यात येईल अशी माहिती सर्पमित्र डॉ. पाठक यांनी दिली.
 
पुढील स्लाईडद्वारे पाहा अजगराच्या पिल्लुचे उपचार करतानाचे फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...