आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा : राज्यात ४ वर्षांनंतर पहिल्यांदा रब्बीची पेरणी शंभर टक्क्यांवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मागील चार वर्षांत झालेला हवामान बदल खरिपासह रब्बी पेरणीलाही मारक ठरला. उत्पादनात मोठी घट झाली. परंतु यंदा पाऊस चांगला असल्याने खरीप पिकांना जीवदान तर मिळालेच, पण चार वर्षांनी पहिल्यांदाच रब्बीची पेरणी शंभर टक्क्यांवर जाईल. सरासरी क्षेत्राच्या ३० टक्के अधिक क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता कृषितज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
राज्यात १ जून ते ३ सप्टेंबरपर्यंत सरासरी ९४९.४ मिमी अपेक्षित पावसाच्या तुलनेत ८५१.७ मिमी म्हणजेच ८९.७ टक्के पाऊस झाला. प्रस्तावित सरासरी १३९.६४ लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १४५.४२ लाख हेक्टरवर (१०४ टक्के) पेरणी पूर्ण झाली आहे. मराठवाड्यात औरंगाबाद विभागात १०७ व लातूर ९७ टक्के खरीप पेरणी झाली. मागील तीन दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत आहे. यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, ज्वारी, बाजरी आदी पिकांना जीवदान मिळाले. मूग, उडदाची काही ठिकाणी काढणी झाली असून उर्वरित काढणी प्रगतिपथावर आहे. बाजरी, ज्वारी, सोयाबीनचे खळे दीड महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर रब्बीसाठी राज्यात सुमारे ६० लाख व मराठवाड्यात १९ लाखांवर सरासरी हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. पावसाच्या पुनरागमनाने चार वर्षांनंतर यंदा रब्बीची शंभर टक्क्यांवर पेरणी पूर्ण होणार आहे. खरीप व रब्बीचे विक्रमी उत्पादन हाती येईल व अन्नधान्यांच्या किमती नियंत्रित ठेवण्यास मदत होईल, असा विश्वास कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढवण, सतीश शिरडकर, हवामानाचे अभ्यास प्रा. प्रल्हाद जायभाये यांनी व्यक्त केला.
पुढील स्‍लाइडवर वाचा, हरभरा, करडई उत्पादनात वाढ
बातम्या आणखी आहेत...