आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारला मतदारच आता धडा शिकवतील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- पंचायतराज व्यवस्था कमकुवत करण्याचे धोरण युती सरकारचे आहे. सरकारचा कारभार केवळ नेमचेंजिंग असल्याने स्थानिक स्वराज्य आणि महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्ष नंबर एकवर राहील असे सांगतानाच हे सरकार सर्व स्तरांवर अपयशी ठरल्याने मतदारच आता त्यांना धडा शिकवतील, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. 

जिल्हा परिषद लोणी खुर्द पंचायत समिती लोणी बुद्रूक आणि खुर्द गणातील काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारप्रसंगी विखे बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस लोणी खुर्द गटाच्या उमेदवार शालिनी विखे, लोणी बुद्रूक गणातील उमेदवार काळू रजपूत, लोणी खुर्द गणातील संतोष ब्राम्हणे आदींसह सोपान मैड, काशिनाथ विखे, सुभाष विखे, किसनराव विखे, भागवतराव विखे, भगवंतराव विखे, वसंतराव विखे, संपतराव विखे, चंद्रकांत म्हस्के, सरपंच लक्ष्मण बनसोडे, अनिल नानासाहेब विखे, राहुल धावणे, शंकर विखे, भाऊसाहेब तुकाराम विखे, नंदू राठी, गहिनीनाथ विखे उपस्थित होते.
 
विखे म्हणाले, राज्यात नगर पालिकेपासून काँग्रेसच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे. नोटाबंदी, ग्रामीण बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्नासंह अनेक गोष्टींमध्ये या सरकारने जनतेची फसवणूक केली. स्थानिक स्वराज्य संस्था कमकुवत करण्याचे मुख्य धोरण शासनाने घेतले आहे. काँग्रेस आघाडी सरकारच्या योजनांचे केवळ नाव बदलून अनेक योजना ब्रँडींग करून सुरू आहेत. राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये मतदारांचा उत्साह हा मोठा आहे. यामुळे निश्चित काँग्रेस पक्ष राज्यात आघाडीवर राहील असेही त्यांनी सांगितले. 

माजी मंत्री म्हस्के म्हणाले, बाळासाहेब विखे यांच्या विचारांसोबत आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. सत्तेच्या माध्यमातून काय विकासकामे होऊ शकतात हे शालिनी विखे अध्यक्ष असताना त्यांनी दाखवून दिले. ही उमेदवारी तमाम जनतेची आहे. तेव्हा मतभेद बाजूला ठेवून काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन करतानाच विकासकामांना विरोध म्हणून काहीजण आता प्रत्येकवेळी वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवारी घेत आहेत त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून कायमचा धडा मतदारांनी मतपेटीच्या माध्यमातून शिकवावा, असे त्यांनी सुचित केले. 

प्रास्ताविक अनिल नानासाहेब विखे यांनी केले. आभार माजी उपसरंपच आनिल विखे यांनी मानले.लोणी खुर्द येथील सभेस कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, शांतीनाथ आहेर, के.पी नाना आहेर, चांगदेव घोगरे, बाळासाहेब भगवंत आहेर,पंचायत समिती सदस्या पुष्पाताई आहेर, माजी सदस्य संपतराव आहेर, सोसायटीचे चेअरमन संजयराव आहेर,वंसतराव आहेर, सुभाष गमे, पी.डी गमे, हरिभाऊ आहेर, श्रीकिसण आहेर, वसंत घोगरे,राजेंद्र घोगरे, सरपंच सौ.मनिषा आहेर, उपसरपंच सुवर्णा घोगरे, आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

मी केलेली विकासकामे आपल्यासमोर 
माझीविकासकामे आपल्यासमोर आहेत. आपल्या आग्रहाखातर ही निवडणूक मी लढवत आहे. तेव्हा ही निवडणूक आपण हातात घेऊन काम करावे, काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन लोणी खुर्द जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शालिनी विखे यांनी या वेळी केले.