आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वरुणराजाचा दिलासा : मराठवाड्यात पन्नास तालुक्यांत १५० मिमीहून जास्त पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अौरंगाबाद - मराठवाड्यात औरंगाबाद आणि बीड जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांत १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक २४६ मिमी पाऊस झाला असून मराठवाड्यातील ५० तालुक्यांत १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यापैकी ३१ तालुक्यांनी आतापर्यंतची अपेक्षित सरासरी अोलांडली. भोकर तालुक्यात सर्वाधिक ४०० मिमी, तर धारूर तालुक्यात सर्वात कमी ८३ मिमी पाऊस झाला. पाच तालुक्यांत अपेक्षित सरासरीच्या ६० टक्केदेखील पाऊस झालेला नाही.

नांदेड, हिंगोली आणि लातूर िजल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस आहे. मराठवाड्यात ६ जूनअखेर १८४ मिमी पाऊस अपेक्षित असताना आतापर्यंत १७५ मिमी (९५ टक्के) पाऊस झाला. सरासरीच्या हे प्रमाण २२ टक्के आहे.

धारूर गंगापूरमध्ये सर्वात कमी पाऊस
मराठवाड्यात पाच तालुक्यांत अपेक्षित सरासरीच्या ६० टक्केदेखील पाऊस झाला नाही. यामध्ये बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात सर्वात कमी केवळ ८३(५०) मिमी पाऊस झाला आहे. तर गंगापूर ८५(५५), फुलंब्री ८७(५१), परळी ९८(५७), कळंब ८९ (५१) मिमी पाऊस झाला आहे.

५० तालुक्यांत १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस
मराठवाड्यात ५० तालुक्यांत १५० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. तर ३१ तालुक्यात अपेक्षीत सरासरीच्या आधिक पाऊस झाला आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ०२, जालना ०४, परभणी ०५, हिंगोली ०५, नांदेड १६, बीड ०५, लातूर ०९ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ४ तालुक्यात १५० मिमीपेक्षा आधिक पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील औरंगाबाद १६०(९६), सिल्लोड १५९ (९६), तर वैजापूर तालुक्यात १३२ मिमी पाऊस झाला असून अपेक्षीत सरासरीच्या ११२ टक्के पाऊस झाला आहे. तर जालना जिल्ह्यात चार तालुक्यात अपेक्षीत सरासरीच्या जास्त पाऊस झाला आहे. परतूर २३२-(१४०), मंठा १८१-(११२), अंबड २०६-(१२९), घनसावंगी १७२(११०), मिमी पाऊस झाला आहे. तर परभणी जिल्ह्यात चार तालुक्यात अपेक्षीत सरासरीच्या आधिक पाऊस झाला आहे. यामध्ये पुर्णा- १९२-(१०१), सोनपेठ १८४ (१२८), सेलु - १९७(११९), जिंतूर -१५४(८०), मानवत १६६(१००) पाऊस झाला. तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी २२६ मिमी पाऊस झाला तरी ०२ तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामध्ये हिंगोली १८६-(८५), कळमनुरी -३०३- (१२९) ,सेनगाव-२०२(९०), वसमत -२४२(१२५), अौढा नागनाथ -२०६(९२). तर नांदेड जिल्ह्यातील सर्व १६ तालुक्यात १५० मिमीपेक्षा आधिक पाऊस झाला असून १० तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. यामध्ये नांदेड- ३००-(१४९) , मुदखेड १९२(८१), अर्धापूर-३०२(१५०) , भोकर -४००- (१७६), उमरी १५०(६६),-कंधार १६२(८६), लोहा २३५(११५), किनवट २४९-(१००), माहूर- २९८-(१२०), हदगाव-३३२-(१४६), हिमायतनगर -३५८( १५७), देगलूर- १७४- (८७), बिलोली-२३५-(१०७), धर्माबाद- १७१-(८०), नायगाव-१६९-(७९), मुखेड -२०४-१०१ तर बीड जिल्ह्यात पाच तालुक्यात अपेक्षीत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. पाटोदा- १९१-(११७), आष्टी १६०( ११४), वडवणी -१९९-(१२१), अंबाजोगाई १५९(९२), माजलगाव -१७६(१०५), तर लातूरमधल्या पाच तालुक्यात सरासरीपेक्षा आधिक पाऊस झाला आहे. यामध्ये औसा-१६५- (१०२), रेणापूर- १७८(११२), उद्गगीर -१५०(७७), अहमदपूर-१९०-(९६), चाकूर-२५६-(१२०), जळकोट -२०१-(९३) , निलंगा- २२८-(१४४), देवणी-१६५-(७६), शि.अनंतपाळ- २०२-(१२७) आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील केवळ एका तालुक्यात अपेक्षीत सरासरीच्या आधिक पाऊस झाला आहे. यामध्ये तुळजापूर- १८९-(११०), उमरगा -२०४-(८२), लोहारा १७२(६९), भूम १५५(९२) पाऊस झाला आहे. (कंसातील आकडेवारी अपेक्षित सरासरीच्या टक्केवारीत)

विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता
पुणे | बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र ठळक झाल्याने येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र व विदर्भात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला. कोकणात मुसळधार पावसाचा इशारा असून ८ जुलै रोजी मराठवाड्यातही चांगल्या पावसाची शक्यता आहे.

भीमा-कृष्णा उपखोऱ्यांतील पाऊस टिकून
सोलापूर | भीमा आणि कृष्णा नद्यांच्या उपखोऱ्यांतील पावसाचे प्रमाण किंचित कमी झाले असले, तरी पाऊस टिकून आहे. त्यामुळे नदीपात्रांत आणि या भागांतील धरणांच्या पाणीसाठ्यात पाणी जमा होण्याचे प्रमाण कायम आहे.

६ तालुक्यांत ३०० मिमीपेक्षा जास्त
पुणे | नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यात ३००, अर्धापूर ३०२, भोकर ४००, हदगाव ३३२, िहमायतनगर-३५८, आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीमध्ये ३०३ मिमी पाऊस झाला आहे. १९ तालुक्यांत २०० मिमी पेक्षा अधिक पाऊस आहे.

गंगापूरचा साठा १ टीएमसीवर
नाशिक | दोन दिवसांपासून पडलेल्या पावसाने नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यात वाढ झाली असून गंगापूर धरणाचा साठा १, तर दारणा धरणाचा साठा २ टीएमसीवर पोहाेचला आहे. या पावसामुळे नद्या-नाल्यांमधून पाण्याचा प्रवाह सुरूच आहे. नाशिक जिल्ह्यात बुधवारी १३२.३ मिमी पावसाची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यातील सर्व २३ लहान-मोठे प्रकल्प मिळून ४ हजार ३५५ दलघनफू म्हणजे ७ टक्के पाणी धरणांत शिल्लक आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...