आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस आला! दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर औरंगाबादेत पावसाचे आगमन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पावसासाठी आसुसलेल्या शेतकर्‍यांसह शहरातील नागरिकांना रविवारी रात्री सुरू झालेल्या संततधारेने दिलासा दिला. औरंगाबाद शहरात जवळपास सर्वच भागांत रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. उशिरा दाखल झालेल्या नैर्ऋत्य मोसमी वार्‍यांनी यंदा दोन दिवसांपूर्वी मुंबईत वर्दी दिली. मात्र, हा पाऊस पुढे सरकला नव्हता. रविवारी मराठवाड्यात अनेक भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 7 जुलैपासून राज्यात पावसाला प्रारंभ होईल, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. दरम्यान, मान्सून सक्रिय झाला असून, मध्य भारतात अनेक भागांत पाऊस झाला.
- औरंगाबादेत मध्यरात्रीपासून संततधार
- यंदाच्या मोसमातील पहिलाच पाऊस
- शहराच्या अनेक भागांत वीज खंडित
- दमदार पावसाच्या आशा पल्लवित
फोटो - दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या औरंगाबादकरांच्या आशा रविवारी मध्यरात्री झालेल्या संततधार पावसामुळे पल्लवित झाल्या. छाया : अरुण तळेकर