आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलंब्रीमध्ये अतिवृष्टी; औरंगाबादेत 25.2 मिमी, शेतकरी चिंतातूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने जिल्ह्यात फुलंब्रीवर कृपा केली. फुलंब्रीत अतिवृष्टीची नोंद झाली असून तेथे 100 मिमी पाऊस झाला, तर सोयगाव तालुक्यात पावसाचा थेंब पडला नाही. शहरात मात्र 25.2 मिमी पाऊस झाला.

सिल्लोड तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला असून पैठण, खुलताबाद, औरंगाबाद, गंगापूर, वैजापूर तालुक्यांत रिमझिम पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. स्थळनिहाय पडणार्‍या पर्जन्यमानात मोठा फरक आहे. बहुतांश तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

मराठवाड्यातील पाऊस 12 जुलैपर्यंत लांबला
पुणे । नान्यौक चक्रीवादळानंतर प्रशांत महासागराच्या वायव्य भागात निओगुरी नावाचे वादळ सक्रिय झाले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील पावसासाठी आवश्यक असणारे बंगालच्या उपसागरावरील बाष्प या वादळाकडे खेचले जात आहे. त्यामुळे मराठवाड्यासह राज्यात अन्य भागांतही मान्सून सक्रिय होण्यास 12 जुलै उजाडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मान्सूनची उत्तरसीमा सोमवारी आणखी उत्तरेकडे सरकली आहे. विदर्भाचा बराचसा भाग, मध्य प्रदेशचा पूर्व भाग आणि उत्तर प्रदेशचा काही भाग व्यापून मान्सून आता राजस्थानच्या वाटेवर आहे.
फोटो - रविवारच्या पावसातील फोटो