Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» News About Ram Mandir

राममंदिर मुद्दा: वादळ उठवण्याची वेळ आणू नये; विश्व हिंदू परिषदेचे शंकर गायकर यांचा इशारा

प्रतिनिधी | Mar 20, 2017, 08:34 AM IST

  • राममंदिर मुद्दा: वादळ उठवण्याची वेळ आणू नये; विश्व हिंदू परिषदेचे शंकर गायकर यांचा इशारा
वेरूळ-सध्या केंद्रासह उत्तर प्रदेशात आलेल्या भाजप सरकारला इतर पक्षांपेक्षा थोडासा का होईना राम कळतो, म्हणून त्यांनी राज्यसभेत संख्याबळ असो किंवा नसो तरीही राममंदिर मुद्द्यावर लवकरात लवकर संयुक्त अधिवेशन बोलवून हा प्रश्न मार्गी लावावा. आम्हास राममंदिर मुद्द्यावर शांतता भंग करायची नाही, परंतु जर केंद्राने अशी वेळ आणली तर या मुद्द्यावर वादळ उठवावे लागेल, असे मत विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय अधिकारी शंकर गायकर यांनी दैनिक ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

वेरूळ येथील श्रीसंत जनार्दन स्वामी आश्रमामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दलाच्या देवगिरी प्रांत दोन दिवसीय प्रांतीय अधिवेशनात ते बोलत होते. या वेळी ते पुढे म्हणाले की, रामजन्मभूमीवर भव्य राममंदिर बांधण्याच्या दृष्टीने सोमनाथ मंदिराप्रमाणे संसदेत कायदा करावा यासाठी १४ जिल्ह्यांत २५ ठिकाणी गुढीपाडवा ते हनुमान जयंती या काळात भव्य सभासह मोठ्या प्रमाणावर रामउत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच ऐतिहासिक भूमी असलेल्या औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याकरिता हे सरकार जाणीवपूर्वक उशीर करीत असून यासाठी सरकारकडे पत्रव्यवहार करीत आहोत, परंतु सरकारला बहुतेक पत्रव्यवहाराची भाषा समजत नसेल म्हणून त्यांना ज्या भाषेत समजेल त्या भाषेत सांगण्याचीही तयारी करीत आहोत.

या अधिवेशनास समाजरत्न श्री श्री १००८ महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज यांची विशेष उपस्थिती होती, तर या वेळी प्रांत मंत्री अनंत पांडे, प्रांत अध्यक्ष आप्पा बारगजे, लक्ष्मीनारायण चांडक, बजरंग दलाचे संयोजक शिवप्रसाद कोरे, सहसंयोजक प्रांत अॅड. सुनील चावरे आदी उपस्थित होते.

उत्तर प्रदेशात जातीपातीचे राजकारण संपणार...
देशएक चांगला संन्याशी अनुभवत असल्याने आता उत्तर प्रदेशातील जनतेनेही दुसऱ्या चांगल्या संन्याशीच्या हातात सत्ता दिली आहे. योगी आदित्यनाथांमुळे आता उत्तर प्रदेशातील जातीपातीचे राजकारण संपून श्रीरामाच्या राज्यातील रामराज्य पुन्हा येईल तसेच उत्तर प्रदेशातील हिंदूंसह मुस्लिमांनाही भाजप सरकारची नव्हे तर न्याय, समता, निर्भय अशा विचारांची स्थापना केलेली आह.े यामुळे आता येथे हिंदूंचे विचारही मागे जाणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.

Next Article

Recommended