आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खोली खाली करण्याच्या कारणावरून रांजणगावात पती-पत्नीला मारहाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- भाडेपट्ट्याने घेतलेली खोली खाली करण्याच्या कारणावरून चौघा जणांनी भाडेकरी पती-पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना रांजणगाव शेणपुंजी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. संतोष गवळी (२६),जयश्री गवळी (२२ रा.काळेगाव सांगवी जि.नाशिक ह.मु.माउलीनगर,रांजणगाव शेणपुंजी) अशी जखमी पती-पत्नीची नावे आहेत. 
 
येथील माउलीनगरात गवळी पती-पत्नी भाडेपट्ट्याने खोली घेऊन राहतात. या दांपत्याकडे शनिवारी रोजी रात्री आठच्या सुमारास काही कामानिमित्त काही महिला आलेल्या होत्या. तेव्हा परिसरातील अनोळखी तीन-चार जणांनी गवळी यांना घराबाहेर बोलावून घेतले. त्यांना घरातील महिला कोण? अशी विचारणा करून खोली लवकर खाली कर, नाही तर ठार मारू, अशी धमकी देऊन बजावले. तेव्हा जयश्री गवळी या बाहेर आल्या. त्यांनी चार-पाच दिवसांचा वेळ द्या, आम्ही दुसरी खोली बघतो, असे सांगितले. मात्र, संबंधित अनोळखींनी त्यांना शिवीगाळ सुरू केली. त्यावर जयश्री यांनी त्यांना शिव्या देऊ नका, असे बजावले. त्यावर त्यांनी पती-पत्नीला बेदम मारहाण केली. एका आरोपीने मारहाण करताना त्याच्या हातातील कडे डोक्यात लागल्याने जयश्री गवळी यांचे डोके फुटल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 
बातम्या आणखी आहेत...