औरंगाबाद - सख्या भाऊजीने मेहुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. वीस वर्षीय पीडितेच्या फिर्यादीवरून चिकलठाणा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आल्याचे चिकलठाणा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितले.
पीडिता आडगाव बुद्रुक येथील रहिवासी आहे. ती सिडकोतील एका महाविद्यालयात बी.कॉमचे शिक्षण घेते. तिची मोठी बहीण पुण्यात नोकरी करते. १९ एप्रिल रोजी आरोपीने नोकरीचे आमिष दाखवून पीडितेला औरंगाबाहून पुण्याला नेले. तेथे आठ दिवस तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. कुणाला सांगितल्यास तुझ्या बहिणीला सोडून देईल, अशी धमकी दिली. पीडितेने १२ जून रोजी चिकलठाणा पोलिस ठाणे गाठत भाऊजीच्या विरोधात तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक ताईतवाले यांनी ही बाब गांभीर्याने घेत पुण्याला एक पथक पाठवून २४ तासाच्या आत आरोपीला गजाआड केले. महिला पोलिस उपनिरीक्षक राठोड तपास करत आहेत.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)