आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार प्रकरणात आरोपींची चौकशी, लगिक शोषण झाल्याची पोलिसांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद- जिन्सी भागात एका शाळेतील विद्यार्थिनीवर शिक्षकासह तीन रिक्षाचालक, संगणक शिक्षकाने बलात्कार केल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी जिन्सी पोलिस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी अरबी भाषेच्या शिक्षकाला अहमद खान अामिर खान (३८, रा. मंजूरपुरा) याला अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींची जिन्सी पोलिसांनी चौकशी केली असल्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर वसुरकर यांनी सांगितले. दरम्यान, मुख्य आरोपीची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली अाहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पीडित मुलीची प्रकृती अजूनही स्थिर नसल्यामुळे तिचा जवाब नोंदवण्यात आलेला नाही. त्यामुळे नेमका काय प्रकार घडला, हे स्पष्ट झालेे नाही. या प्रकरणाशी संबंधित अनेकांची पोलिसांकडून विचारपूस सुरू आहे. पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.

जबाबाचा नियम असा :
पीडित मुलगी आठ वर्षांची आहे. २० दिवसांपूर्वी नराधम शिक्षकाने तिच्यावर बळजबरी केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिचे लैंगिक शोषण झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी वैद्यकीय चाचणीनंतर सांगितले आहे. त्या दिशेने तपास सुरू असून सात वर्षाच्या पुढील मुलीचा जवाब कायद्याच्या दृष्टीने ग्राह्य धरला जातो,अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...