आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणमध्ये मुलीवर सावत्र पित्याने केला अत्याचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पैठण -   शहरातील इंदिरानगर भागात राहणाऱ्या १० वर्षीय मुलीचा सावत्र पित्याने दारूच्या नशेत १५ दिवसांपूर्वी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.   
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरानगर भागात मोलमजुरी करून उपजीविका भागवणाऱ्या महिलेचा दुसरा पती आरोपी  रमेश बबनराव चव्हाण याने  सावत्र १० वर्षीय मुलीवर १५ दिवसांपूर्वी बलात्कार केल्याची  घटना रविवारी  रात्री १० वाजता उघडकीस आली आहे. वरील घटनेची माहिती मिळताच स्थानिक जमावाने सावत्र पित्यास जबर  मारहाण केली व  जमावाने नराधम आरोपीस पोलिसांच्या स्वाधीन केले.
 
दरम्यान, रविवारी पुन्हा नराधम बाप पीडित चिमुकलीवर बलात्कारचा प्रयत्न करत असताना अचानक मुलीच्या आईने पाहिले व घटना उघडकीस आली. नराधम पित्यास पोलिसांनी अटक आली असून मुलगी व आईच्या  फिर्यादीवरून  पैठण पोलिस ठाण्यात आरोपी सावत्र पित्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षक  डॉ. आरतीसिंह, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्निल राठोड, पोलिस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. 
बातम्या आणखी आहेत...